दिनांक: ९ जून, १०१५
एकमात्र खरे की, ब्राम्हणांनी भूतकाळात सामाजिक न्यायाबाबत केलेल्या चुका गंभीर असल्या, तरी इतिहासातील मढी उकरून काढून ब्राम्हण समाजाला उठसूठ आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्यातही कुठलेच सामाजिक शहाणपण नाही. ब्राह्मण समाज भलेही दलितांबाबत अनास्था दाखवीत असेल; तरीही हा समाज दलितांची घरे-दारे पेटवली पाहिजेत, त्यांच्यावर अत्याचार केले पाहिजेत, या मताचा मुळीच नाही हे त्रिवार सत्य आहे. ब्राम्हण समाजातील बुद्धिजीवी -विचारवंत वर्ग दलितांना सामाजिक न्याय मिळाला पाहिजे याच मताचा आहे.
(बी. व्ही. जोंधळे, पुरोगामित्व, जातिव्यवस्था आणि कसबे, मटा, ९/६/२०१५)
अहो! हे सर्व समजतंय तर द्या की सोडून ब्राम्हणांवर पुराणकालिन आरोप करीत करीत जगणे. एक औरंगजेब हिंदूद्वेषी होता म्हणून सर्वच मुस्लिम हिंदूद्वेषी होत नाहीत अाणि अकबर सहिष्णू होता म्हणून सर्वच मुल्लिम सहिष्णू होणे शक्य नाही. इतिहासातील मढी उकरून काहीच हाताला लागणार नाही. 'गेलेले दिवस' महिलांचेच काय कोणाचेच परत येत नाहीत. जो द्वेषाने जळतो तो स्वतःचेच आयुष्य जाळून घेत असतो, आणि त्यातच त्याचे रामनाम सत्य होते.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!
रामदास पवार
-अंबरनाथ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा