उलटी अभियांत्रिकी
मेईजी क्रांती (१८६८) नंतर जपानने अशी प्रतिज्ञा केली की जगाच्या सर्व कोपर्यातून ज्ञानाचा शोध घेण्यात येईल. कारण त्यापूर्वी कोणी ज्ञान दिले तरी हा जपान ते घेत नसे.
एकदा आधुनिक बनायचा निश्चय केल्यावर जपान झपाट्याने कामाला लागले. प्रगत देशांतून त्यांनी विविध देशांचे नमूने मागवले. त्या देशातील कंपन्यांनी सुद्धा मोठी आॅर्डर मिळण्याच्या आशेने आपले सर्वोत्तम नमूने पाठवून दिले. जपानने ते पूर्ण उघडून त्याचे रेखाचित्र, धातूचा वापर याबद्दल जाणून घेतले. (Reverse Engineering) त्यानंतर त्यामध्ये अजून सुधारणा करीत वस्तू उत्पादित केल्या. लवकरच प्रगत देशांतील कंपन्यांचा माणूस आशेने येई व विचारी की नमूने कसे वाटले? तर जपान म्हणे की बरे होते पण आमच्याकडे तर त्याहूनही चांगल्या वस्तू उत्पादित होतात. त्याला ते आपल्या वस्तू दाखवत. तो आश्चर्याने बघतच राही. जपान त्यालाच विचारी की आॅर्डर असेल तर सांगा.
यावरून आपल्या लक्षात आले असेल की भारताची 'मेक इन इंडिया' ही वरील गोष्टीची सुधारित आवृत्ती आहे. पंतप्रधान होण्यापूर्वी आपले मोदीजी खुप वेळा जपानला जाऊन आलेले होते. यावरून काय ते समजा. ही 'मोदीक्रांती' आहे.
©रामदास पवार
अंबरनाथ
(२४ डिसेंबर, २०१५)
संदर्भ :
MAHARASHTRA TIMES: उगवता सूर्य - जपान
http://maharashtratimes.indiatimes.com/career/competitive-exams/Japan-History/articleshow/50302348.cms