दिनांक: २६ आॅगस्ट, २०१५
'शहीद' या शब्दाने मराठी भाषेत जोरदार मुसंडी मारल्यामुळे त्याला आहुती देऊन लवकरात लवकर 'हुतात्मा' केले पाहिजे.
दिनांक: २६ आॅगस्ट, २०१५
'शहीद' या शब्दाने मराठी भाषेत जोरदार मुसंडी मारल्यामुळे त्याला आहुती देऊन लवकरात लवकर 'हुतात्मा' केले पाहिजे.
दिनांक: २० आॅगस्ट, २०१५
'बलात्कार एक पुरूष करू शकेल, चार व्यक्तींकडून कसा शक्य आहे?'
-मुलायम सिंह यादव
आयला याला बलात्काराचा बराच अनुभव दिसतोय. मारून मारून आणखी 'मुलायम' केला पाहिजे रिमांडमध्ये घेऊन. टायरमध्ये घालून फटके द्यायला पाहिजेत.
दिनांक: १९ आॅगस्ट, २०१५
बिहारच्या निवडणूका आल्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना कान टवकारून ऐकायला सांगितले. बिहारमधील भाषणात. सभेला उपस्थित असलेल्या लोकांना. तर तुम्ही ही कान स्वच्छ करून ऐका. सव्वा लाख कोटी रूपये पंतप्रधानांनी बिहारच्या विकासासाठी देणार असे जाहीर केले.
(१,२५,०००,००,००,०००/-₹) अबब! इतके? एका निवडणुकीला? अमिष म्हणून? मागच्या लोकसभेच्या निवडणूकीच्या वेळी ५० हजार कोटी देणार असे बोलले होते मोदीसाहेब. बिहारने सुद्धा त्यांना भरभरून मते दिली. पण मागच्या सव्वा वर्षात ते ५० हजार कोटी दिलेच नाहीत. उलट मागच्याच महिण्यात बिहारमध्ये जाऊन ते जुने पन्नास आणि आणखी ५० हजार कोटी देणार असे बोलले होते. म्हणजे एकून १ लाख कोटी. आणि आता भाव आणखीन २५ हजार कोटींनी वाढवला. आता झाले सव्वा लाख कोटी. दुबईला जाऊन तिथल्या शेख कडून पैसे आणले की काय मोदींनी? की काळा पैसा आणणार आहेत स्विस बँकेतला?
मला तर असे वाटायला लागले आहे की, महाराष्ट्रात पण पुन्हा निवडणूका घ्याव्यात. आम्ही सर्वच्या सर्व आमदार निवडून द्यायला तयार आहोत. आम्हाला पण सव्वा लाख कोटी द्या.
माझे बिहारच्या लोकांना एक सांगणे आहे, 'बघा बाबांनो! विचार करून मतदान करा. कोण खरा कोण खोटा याचा विचार करा. अपेक्षाभंगाचे दु:ख खुप वाइट असते. हा चुनावी जुमला निघाला तर पोपट होईल तुमचा! सावधान!
ता.क.: जाता जाता आणखी चाळीस हजार कोटी देणार आहेत म्हणे. चक्कर येतेय.
दिनांक: १८ आॅगस्ट, २०१५
गडकरींची पुर्ती, शिवराज चव्हाण यांचे व्यापम, स्वराज बाईंचे ललितगेट, महाराष्ट्रातील चिक्की असे अनेक आरोप वर्षभर गाजत असताना आपल्या सरकारवर भ्रष्टाचाराचा वर्षभरात एकही आरोप झालेला नाही, असे धडधडीत असत्य सांगण्यासाठी आणि महागाईच्या झळा थोड्याही कमी झालेल्या नसताना, 'महागाई संपली' असे ठासून सांगण्यासाठी खरेच ५६ इंची छाती हवी.
(मटा अग्रलेख, १७/८/२०१५)
यासाठी ५६ इंची छातीच नाही तर टणक काळजाचा, मगरीचे अश्रू ढाळू शकणारा, गेंड्याच्या कातडी सारखा काहीही, कशाचाही परिणाम न होणारा, लोणच्यासारखा मुरलेला, शरद पवारांसारखा राजकारणी पाहिजे. आणि आपले पंतप्रधान तसे आहेत. उगीच नाही महिन्याला दोनतीन वेळा फोन करून राजकारणचे धडे घेत. हे सर्व ऐकून लाल किल्ल्याची छातीही अभिमानाने ५६ इंची झाली असेल नाही?
जय हिंद!
दिनांक: भारतीय सौर २३ श्रावण शके १९३७,
१४ आॅगस्ट, २०१५
मला हे कळत नाही की हे सर्वच कम्युनिस्ट गबाळेपणाने का राहतात. दाढी काय वाढवतील, केस काळे करणारच नाहीत. काही जणांची दाढीतर वडाच्या पारंब्या सारखी कशीही, कुठेही वाढलेली असते. खर्च करायला पण एकदम कंजूष मारवाडी. म्हणूनच तर दाढी आणि कटींगचे पैसे वाचवत नसावेत?
एकदा मी सहजक माझ्या नात्यातील कम्युनिस्टाला याचे कारण विचारले. तर माझ्याकडे संशयास्पद रितीने पाहायला लागले. मग मीच घाबरून म्हणालो की असे तर नाही ना 'सिंपल लिव्हींग अँड हाय थिंकींग?' तर एकदमच कळी खुलली (त्यांची) आणि जीव भांड्यात पडला बिचार्याचा. (माझा) 'नाऊ यू आर आॅन करेक्ट पाथ' खूष होऊन बोलले. माझ्या पण जिवात जीव आला. नाहीतर हे लोक कधी काय टोमणा मारतील आणि आपल्याला खाली पाडतील याचा काही नेम नाही. 'जगातील झाडून सारे लोक वेडपट आहेत. हेच फक्त विचारवंत.' असे त्यांचे ठाशीव मत असते. बाकी काही असू देत पण यांचा गबाळेपणा मला नेहमीच खटकतो. असो.
रशियाचे विघटन झाले. तुकडे तुकडे झाले. याचे सर्वात मोठे दुख यांना. तर चीन महासत्ता होतोय याचा सर्वात मोठा आनंद पण यांनाच. अमेरिका यांची दुष्मन. तर रशिया-चीन दोस्त. १९६२ चे चीनचे युद्ध भारतामुळे झाले असे यांचे ठाम मत असते.
तसे ते असतात हुशार, बुद्दिवंत, अभ्यासू, वादविवाद करण्यात पटाइत. त्यातच सर्वात मोठा आनंद घेतात. वादविवाद म्हणजे यांचा खुराक. वाद घालतात आणि बुद्धी तल्लख ठेवतात.
यांची सर्वात मोठी ओळख म्हणजे हे सतत गरिबांचे कैवारी असतात आणि श्रीमंतांचे सतत दुष्मन. गरिब कधीकाळी श्रीमंत झाले तर त्या गरिबांचेही हे दुष्मन होणार याची १०० टक्के शाश्वती, खात्री. मग कधीकधी शंका येते की यांना गरिबांना गरिब ठेवण्यातच रस आहे की काय?
या कम्युनिस्टांना लाल सलाम!
दिनांक: ९ आॅगस्ट, २०१५
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल एका जुन्या आणि साध्या हाॅटेलमध्ये एकदा जेवायला गेले. जुन्या प्रेमाच्या आठवणी जागवण्यासाठी.
हाॅटेलचा मालक भरपूर खुष झाला. तो दोघांना भेटून गेला आणि दोघांचेही त्याच्या हाॅटेलमध्ये आल्याबद्दल आभार मानले. काही वेळाने एक चिठ्ठी मिशेलकडे वेटरने आणून दिली. मिशेलने चिठ्ठी वाचली आणि गालातल्या गालात हसत बाजूला ठेऊन दिली. ओबामांनी तिला विचारले, "काय आहे चिठ्ठीत?"
तिने सांगितले की, "हाॅटेलच्या मालकाला मला खाजगीत भेटायचे आहे. तो आणि मी एकाच काॅलेजला शिकायला होतो. काहीतरी सांगायचे असेल त्याला."
ओबामा बोलले की, "काही बोलायचे होते तर इथेच बोलायचे होते ना. खाजगीत कशाला?"
तरीही त्यांनी मिशेलला परवानगी दिली.
मिशेल हाॅटेल मालकाला भेटायला गेली आणि दहा मिनिटांनी परत आली तेव्हा ओबामांनी तिला उत्कंठेने विचारले की, "काय झाले. काय बोलला तो." मिशेल गप्प.
"अगं सांग ना." अोबामा.
"जाऊ दे रे त्या आमच्या काॅलेजच्या गोष्टी होत्या." मिशेलने दुर्लक्ष केले.
"सांग. मला ऐकायचे आहे. असे काय होते खाजगी." ओबामा हटून बसले.
'अरे तो सांगत होता की त्याचे माझ्यावर खुप प्रेम होते. पण कधी सांगू शकला नाही."
"ओह! माय गाॅड! मग तू काय बोललीस?" ओबामा.
"मी काय बोलणार ना? चूकचूक, हळहळ करुन परत आले. बिचारा!"
ओबामा तिला खिजवण्यासाठी बोलले. "कसे झाले असते ना तुझे? एका साध्या हाॅटेल मालकाची बायको असती आज."
मिशेल बोलली की, "तो सांगत होता तेव्हा मला तुझी दया येत होती."
"का? का? माझी दया येण्याचे कारण काय?" ओबामांची ऐट.
'अरे मी त्याच्या बरोबर लग्न केले असते तर आज अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असता तो. बिचारा!"