रविवार, २१ फेब्रुवारी, २०१६

फ्रीडम २५१ चे वैशिष्ट्ये

दिनांक: २१ फेब्रुवारी, २०१६

हा फोन तुम्हाला २५१ रुपयात मिळणार आहे. जसा स्मार्ट फोन दिसायला असतो तसाच हा ही असेल. या फोनच्या मुख्य स्क्रीनवर तुम्हाला वेगवेगळी अॅप्लीकेशन दिसतील. त्यात ब्राऊजर सुद्धा असतील. अशी सातआठ स्क्रीन वेगवेगळ्या अॅप्लीकेशनने भरलेले असतील. कोणत्याही ब्राऊजर वर क्लिक केल्यावर जसे होमपेज दिसते तसेच दिसेल. फक्त तुम्हाला काही शोधायचे असेल तर यातले अॅप्लीकेशन फक्त शोधता येतील. फेसबुक शोधले की फेसबुकच्या टाइमलाइनचा फोटो तुम्हाला दिसेल. म्हणजे कोणीही म्हणू शकणार नाही की हा तुमचा खोटा फोन आहे. सर्व अॅप्लीकेशनचे असेच एकेक फोटो असतील. या फोन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाॅलपेपर सुद्धा असतील.

हा या फोनची काॅलर ट्युन मध्येमध्ये वाजत राहील. तुम्ही बाजूला जाऊन फोनवर खोटेनाटे काही बोलू शकता. किंवा हा माणूस खुपच त्रास देतोय असे समोरच्याला सांगून फोनची रिंग बंद करू शकता. कोणी शंका घेतलीच तर आपण हा फोन उघडून त्या शंकेखोराला दाखवू शकता. कारण त्यात बॅटरी, सिमकार्ड स्लाॅट, मेमरी कार्ड स्लाॅट सर्वच दिसेल.

वाॅलपेपर बदलण्यासाठी किंवा अॅपवर क्लिक केल्यावर त्या अॅपची स्क्रीन येण्यासाठी एक लपवलेले फिरते बटण असेल. जे दुसर्‍या कोणाला दिसणार नाही.

थोडक्यात काय तर गरिबातल्या गरिबाला आपल्याकडे स्मार्ट फोन आहे याचा आनंद मिळेल, तोही फक्त २५१ रुपयात. ६ कोटी लोकांनी हा फोन बुक केला आहे. हे सहा कोटी लोक येत्या चारपाच महिन्यात फोन त्यांच्या हाती आल्यावर धमाल उडवून देणार आहेत. मजाच मजा.

अरे हो एक सांगायचे राहिले. यात सेल्फी काढता येईल पण फक्त एकाचा. म्हणजे स्वतःचाच. खोटा खोटा. सेल्फी काढताना फक्त क्लिक असा आवाज होईल. एकापेक्षा जास्त लोक जर सेल्फी मध्ये घ्यायचे असतील त्या सर्वांकडे फ्रीडम २५१ असला पाहिजे. म्हणजे 'एकमेका साह्य करू, अवघ्यांना बणवू मुर्ख' हे त्यांचे ब्रीद पूर्ण करता येईल.

फ्रीडम २५१ चा विजय असो!
जय हो मेक इन इंडिया!

गुरुवार, २४ डिसेंबर, २०१५

उलटी अभियांत्रिकी

उलटी अभियांत्रिकी

मेईजी क्रांती (१८६८) नंतर जपानने अशी प्रतिज्ञा केली की जगाच्या सर्व कोपर्‍यातून ज्ञानाचा शोध घेण्यात येईल. कारण त्यापूर्वी कोणी ज्ञान दिले तरी हा जपान ते घेत नसे.

एकदा आधुनिक बनायचा निश्चय केल्यावर जपान झपाट्याने कामाला लागले. प्रगत देशांतून त्यांनी विविध देशांचे नमूने मागवले. त्या देशातील कंपन्यांनी सुद्धा मोठी आॅर्डर मिळण्याच्या आशेने आपले सर्वोत्तम नमूने पाठवून दिले. जपानने ते पूर्ण उघडून त्याचे रेखाचित्र, धातूचा वापर याबद्दल जाणून घेतले. (Reverse Engineering) त्यानंतर त्यामध्ये अजून सुधारणा करीत वस्तू उत्पादित केल्या. लवकरच प्रगत देशांतील कंपन्यांचा माणूस आशेने येई व विचारी की नमूने कसे वाटले? तर जपान म्हणे की बरे होते पण आमच्याकडे तर त्याहूनही चांगल्या वस्तू उत्पादित होतात. त्याला ते आपल्या वस्तू दाखवत. तो आश्चर्याने बघतच राही. जपान त्यालाच विचारी की आॅर्डर असेल तर सांगा.

यावरून आपल्या लक्षात आले असेल की भारताची 'मेक इन इंडिया' ही वरील गोष्टीची सुधारित आवृत्ती आहे. पंतप्रधान होण्यापूर्वी आपले मोदीजी खुप वेळा जपानला जाऊन आलेले होते. यावरून काय ते समजा. ही 'मोदीक्रांती' आहे.

©रामदास पवार
अंबरनाथ
(२४ डिसेंबर, २०१५)

संदर्भ :
MAHARASHTRA TIMES: उगवता सूर्य - जपान
http://maharashtratimes.indiatimes.com/career/competitive-exams/Japan-History/articleshow/50302348.cms

सोमवार, ७ डिसेंबर, २०१५

शनैश्चर कृतां पीडां न कदाचित् भविष्यति

दिनांक: ७ डिसेंबर, २०१५

ज्यांचा देवावर विश्वासच नाही तेच लोक महिलांना शनीच्या मंदिरात प्रवेश मिळालाच पाहिजे, असा हट्ट धरून बसले आहेत. भांडत आहेत. झगडत आहेत.

ज्या महिलांना शनीच्या कोपाची भीती वाटत नाही त्याच शनी शिंगणापुरच्या शनी चौथऱ्यावर जातील. ज्या महिला जातील त्यांनाच त्याची फळे भोगावी लागतील. (खरेखोटे शनीच जाणो) मग त्यात इतरांनी लुडबुड करण्यात काय हाशील आहे? ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल ही म्हण लोक विसरले काय?

जे लोक दुधाचा अभिषेक करून शनी देवाला शुद्ध करत आहेत त्यांचा खुद्द देवावरही विश्वास नाही असे वाटते. देव अशुद्ध होऊच कसा शकतो? ज्या दुधाचा अभिषेक केला जातो ते शुद्ध असते, असे समजणे खुळेपणाचे लक्षण आहे.

भारत म्हणजे जगातील सर्वात मोठा लोकशाही गोंधळ आहे.

खंडेराया आमचे कुलदैवत असूनही मी अजूनही जागरण गोंधळ घातला नाही म्हणून, मी या सर्व गोंधळात एकदम न्यूट्रल आणि अलिप्त आहे!

ॐ शं  शनैश्चराय नमः

गुरुवार, ३ डिसेंबर, २०१५

लग्नाआधी बायकोचे प्रेम प्रकरण!

दिनांक : २८ नोव्हेंबर, २०१५

महाराष्ट्र टाइम्स मध्ये डाॅ. राजन भोसले वाचकांच्या पत्राला उत्तरे देतात. एकाने प्रश्न विचारला की "माझ्या बायकोने मला सांगितले की, तिचे लग्नाअगोदर एका मुलावर प्रेम होते. तेव्हापासून मला तिचा संशय यायला लागला आहे. तिचं चारित्र्य शुद्ध नसल्याची भावना मनात सतत येत राहते. कशातच स्वारस्य वाटत नाही."

डाॅक्टरांनी त्यांना  समजावून सांगितले की, 'यौवनात सर्वानाच आकर्षण निर्माण होते. तुम्हालीही झाले असेलच. बायकोने तुम्हापासून काही लपवले नाही म्हणजे उलट तिचा तुमच्यावर खुप विश्वास आहे असे दिसते आहे. म्हणून काहीच वाईट विचार मनात न आणता सुखाने संसार करा."

ह्या लेखाच्या शेवटी वाचकांनी सुद्धा प्रश्नकर्त्याचे शंका निरसन केले आहे. ते वाचून त्या बिचाऱ्याने हसावे, रडावे की आणखी काय करावे हे तुम्हीच ठरावा.

कडक बेधडक म्हणतात,
"मुली म्हणजे, मी नाही त्यातली कडी लाव आतली, अशाच असतात..."

पृथ्वीवरील साहेबराव साहेब म्हणतात,
'आधी कितीही लफडी करायची मग लग्नावेळी पैशावाला मुलगा हेरायचा, असेच मुली करतात'

ललित पाटील म्हणतात,
"एखाद्या वेळेस असे होऊ शकते. शरीरसंबंध देखील येऊ शकतात. पण स्वभाव चांगला हवा. एखादे गंभीर स्वरूपाचे प्रेम प्रकरण असणे वेगळे आणि तीनचार लफडी असणे वेगळे. लग्नाअगोदर तीनचार लफडी असतील तर मात्र तुमचे अवघड आहे."

एक अनामिक म्हणतात,
"ही किर्कोळ गोष्ट, लग्ना नंतरही काही बायका प्रेम नाही पण दुसर्‍या पुरुषाचा अनुभव घेतात."

राजेंद्र शहा म्हणतात,
"चालू ठेवा पोरगी खरी आहे!"

आझाद हिंद सांगतात-
"अजिबात संशय करायचा नाही. नशिबाने जे भेटला, त्यात खुष राहायचा. जय हिंद!"

पाहिलं ना मराठी माणूस फुकटचे सल्ले देण्यात किती वाकबगार आहे ते?

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4108373.cms

जय सहिष्णुता!

दिनांक: २ डिसेंबर, २०१५

हेरगिरी रॅकेटमध्ये पाकिस्तानी कर्मचारी-मटा बातमी

बघा हा आपला महाराष्ट्र टाइम्स. मुंबईचे नं. १ मराठी वृत्तपत्र.  बातमीचा मथळा काय दिलाय पहा. 'हेरगिरी रॅकेटमध्ये पाकिस्तानी कर्मचारी.' या बातमीत आयएसआयचे एजेंट असल्याच्या आरोपात दोन जणांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची नावे आहेत कफैतुल्ला खान आणि बीएसएफचा हेड कॉन्स्टेबल अब्दुल रशीद. या दोघांपैकी कोणीही पाकिस्तानी कर्मचारी नाही. दोघेही भारतीय आहेत. त्यांचा हात हेरगिरीत आहे आणि ते पाकिस्तानच्या आयएसआय साठी हेरगिरी करत होते म्हणून पकडले गेले आहेत. यातील कफैतुल्ला खान याने पोलिसांना सांगितले की त्याला पाकिस्तानमध्ये बोलावले होते आणि त्यासाठी विसासाठी भारतातील पाकिस्तानच्या उच्चायुतातील एका कर्मचाऱ्याची मदत घेण्यास सांगितले होते. ज्याचे नाव याला माहित नाही.

वरील बातमीत महत्वाचे काय आहे? पकडले लोक की ज्याचे नावही माहित नाही असा पाकिस्तानी कर्मचारी? ज्याला अटक केली तो बातमीचा मथळा होईल की ज्याचे नाव माहित नाही, जो अजून अंधारात आहे, त्याचा मथळा होईल? त्यात ही बातमी मटाला महत्वाची वाटली नाही म्हणून शेवटच्या पानावर छापली आहे ती कोपऱ्यात. बातमीत इतका संभ्रम निर्माण केलाय की अपराधी कोण आहे, हेच कळणार नाही.

का केले असावे असे महाराष्ट्र टाइम्सने? तुम्हाला आणखी एक सांगतो. मागच्या ७ दिवसात हेरगिरीच्या आरोपाखाली एकून ६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अशी बातमी एनडीटिव्हीने दिली आहे.
वरील दोघे आणि मेरठ मधून मोहम्मद एजाज, कोलकत्यामधून इरशाद अंसारी, त्याचा मुलगा अश्फाक व नातेवाईक मोहम्मद जहांगीर असे एकून सहा. सहा चे सहा मुसलमान आहेत. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे यातील अब्दुल रशीद हा बिएस‍एफचा सैनिक आहे. तो भारतीय स्थलसेना आणि वायूसेनेचे गुपित दस्तऐवज पुरवत होता. दोन वर्षांपासून ते हेरगिरी करून आय‍एस‍आयला माहिती पुरवत आहेत.

आता प्रश्न हा उरतो की महाराष्ट्र टाइम्स हे का लपवतो आहे? आहेत भारतीय मुस्लिम पाकिस्तानचे एजेंट तर आहेत, त्यात लपवून काय मिळणार आहे? कोंबडं झाकून ठेवले म्हणून आरवायचे थांबत नाही हे मटाला माहित नाही काय?

म्हणजे 'मुसलमानांचे ठेवायचे झाकून आणि हिंदूंचे पाहायचे वाकून' यालाच तर सहिष्णुता म्हणत नसावेत?

मीही तुम्हाला सांगतो की, हे ६ जण देशद्रोही निघाले म्हणून सगळेच मुसलमान असे असतात हे समजू नका. मनात काही वाईट वक्टे आणू नका. परमवीरचक्र अब्दुल हमिदला आठवा.

जय सहिष्णुता! जय हिंद!

हेरगिरी रॅकेटमध्ये पाकिस्तानी कर्मचारी
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Technology-drove-Master-Raja-into-police-web-Heres-all-you-need-to-know-about-the-ISI-spy/articleshow/49990264.cms?utm_source=MT&utm_medium=socialplatformname&utm_campaign=onpagesharing  via @maharashtratimes: http://app.mtmobile.in

भारत की जासूसी के लिए बीएसएफ और पुलिस में आईएसआई के एजेंट, दो गिरफ्तार
http://m.ndtv.com/khabar/isi-agent-in-indias-bsf-and-police-for-spying-two-arrested-1249378

शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०१५

असहिष्णू भारत!

दिनांक : २५ नोव्हेंबर, २०१५

हो! हो! भारत १००% असहिष्णू झाला आहे, असे मला वाटते आहे.

अमिर खानच्या बिचार्‍या बालिश बायकोने एक साधा प्रश्न विचारला, की आपण देश सोडून जाऊ या का म्हणून.  तर अमिर खानने तेव्हढ्याच निरागसपणे मिडियाला हा प्रश्न सांगितला. त्यात त्याचे काय चुकले? त्यासाठी एव्हढा गदारोळ माजला याचाच अर्थ भारत असहिष्णू झाला आहे. कोणालाही आपले मन मोकळे करण्याची मुभा देणे म्हणजे सहिष्णुता आहे. हो की नाही?

दुसरी गोष्ट म्हणजे बरेच लेखक आपले पुरस्कार परत करत आहेत. त्यात एव्हढे वाईट वाटण्यासारखे काय आहे? नाही आवडत त्यांना भाजप सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, साक्षी महाराज आणि बरेच लोक. त्यांना काँग्रेस जवळची वाटते हा काय गुन्हा आहे काय? नाही ना?  मग त्याचा इतका गवगवा कशाला? ते तर आपले पुरस्कार शांततेने परत करत आहेत. त्यांनी काही जाळपोळ, तोडफोड, खुन, मारामाऱ्या केल्यात की दहशतवाद माजवलाय?  त्यांना भारताचे वातावरण असहिष्णू वाटतंय तर वाटतंय.  लोकशाही आहे. कोणालाही काही वाटण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे. अशा लोकांना देशद्रोही ठरवणे म्हणजे असहिष्णूता नाहीतर दुसरे काय आहे?

म्हणून मला वाटते भारताचे वातावरण असहिष्णू आहे. मला कोणी परदेशात पाय पण ठेऊ देणार नाही, नाहीतर ....

बाजीराव-मस्तानी

दिनांक : २२ नोव्हेंबर, २०१५

संजय लिला भन्सालीच्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमा विरोधात भरपूर गदारोळ चालू आहे. मला वाटते की ऐतिहासिक व्यक्तींच्या बाबतीत चित्रपट लेखक, निर्माता यांनी खूपच काळजी घेतली पाहिजे. कोणाच्याही भावना दुखावणार नाही हे पहिले पाहिजे. परंतु आपल्या देशात लोकशाही असल्यामुळे आणि कोणालाही काहीही लिहता येते, व्यक्त होता येते. म्हणून लेखक, चित्रपट निर्मातेही काहीही लिहतात, दाखवतात. त्याला आपण कायद्याने काहीच करू शकत नाही. फक्त लोकशाही मार्गाने धरणे धरू शकतो. निषेध मोर्चे काढू शकतो. बाकी काहीच करू शकत नाही. मागे अमीर खानचा पीके आला. भरपूर विरोध झाला त्याला. पण काय झाले. काहीच नाही. उलट अती प्रसिद्धी मिळाली आणि चित्रपट भरपूर चालला. मागे जोधा अकबर हा चित्रपट आणि त्याच नावाची मालिका यांनाही भरपूर विरोध झाला. पण काय झाले? निर्मात्यांनी एक ओळ टाकली, 'हा चित्रपट ऐतिहासिक आहे,असा आम्ही दावा करत नाही.' बस! संपला विषय. चित्रपट प्रदर्शित झाला आणि मालिकाही. नंतर सर्व चिडीचूप.

आता बाजीराव मस्तानी या चित्रपटाबद्दल सुद्धा असे होऊ शकते. हा चित्रपट प्रदर्शित होण्याला अजूनही भरपूर वेळ आहे. १८ डिसेंबरला गोंधळ घालणार आहे तो. म्हणजे एक महिना आहे आणखी. तोपर्यंत तरी भंसाली काही करणार नाही. म्हणून तोपर्यंत 'पिंगा' या गाण्याला विरोध करणारे गोंधळ घालणार.  त्याच्या चित्रपटाला अशीच प्रसिद्धी मिळणार, फुकट. आणि शेवटी काय होणार? काहीही नाही. गाणे तसेच राहील आणि विरोधक सुद्धा गप्प बसतील.

कारण....

कारण चित्रपटात ज्या गाण्यात मस्तानी आणि काशीबाई यांना नाच करताना दाखवले आहे, त्या अगोदर फक्त श्रीमंत बाजीराव पेशवे असे स्वप्न पाहतील की मस्तानी आणि काशीबाई एकत्र नाच करत आहेत. विषय संपला. बाजीरावांनी काय स्वप्ने पहिली असतील याची इतिहासात कुठेही नोंद नाही. याला इतिहासाचे विकृतीकरण म्हणता येणार नाही मग. कल्पनेची भरारी असेल ती. जशी '१५ लाख तो हरएकके खाते में ऐसेही जमा हो जायेंगे', तशी.

जाताजाता: चित्रपट खूप भव्यदिव्य आहे आणि सर्वांना तो आवडेल असे ट्रेलर वरून तरी जाणवत आहे. बेस्ट डायलॉग- बाजीरावने मस्तानीसे मोहब्बत की है,  ऐयाशी नही.

https://youtu.be/eHOc-4D7MjY