शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०१४

'येडे बेधंदी'

दिनांक: ३१ ऑक्टोबर, २०१४

अरे काय हे!
निषेध करताय!
त्रिवार करा नाहीतर तीसवार करा निषेध!
कोण विचारतय तुम्हाला!
हत्ती असा झुलत चाललाय आन तुम्ही आपले लांबून लागले फूंक....
जाऊ द्या!
तुम्हाला ना कधी धंदा जमलाय ना त्याचं मर्म...
अरे वेड्यांनो पाच कोटीत पाचशे कोटीची जाहीरात तुम्हाला करता येईल का?

हिंदीच्या दहा वाहिन्या आणि मराठीच्या सहा बातमी वाहिन्या यांच्यावर दोनतीन तास महाराष्ट्राच्या शपथविधीचा कार्यक्रम दाखवला गेला आहे. भारतातील इतर भाषिक वाहिन्या वेगळ्या!

मुंबईच्या समुद्रात मोठमोठे कमळाचे फुले तरंगत होती. सर्व भारताने ते पाहिले असेल. कमळ निशाणीची सुद्धा प्रसिद्धी!
एवढी प्रशिद्धी पाच कोटीत झाली असती का?
हे फक्त गुजराती-मारवाडी लोकांनाच जमू शकते,
तुम्हाला नाही!
'बेधंदी' मराठी माणसांनो!
तुम्ही फक्त चर्चा, वादविवाद आणि नौकऱ्याच करायच्या लायकीचे आहात!

निशेद करतय येडं! 'मराठी'

-रामदास पकाऊ पवार

जाताजाता: इंदिरा गांधींची पुण्यतिथी सुद्धा आजच होती. ज्या वाहिण्या शपथविधीचा कार्यक्रम दाखवत नव्हत्या त्या भाजपवर टीका करण्याच्या चर्चा घडवत होत्या. म्हणजे तिथेही पुन्हा प्रसिद्धीच! 'बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ।'

गुरुवार, १३ नोव्हेंबर, २०१४

'वृक्षवल्ली आम्हा सोयरी!'

दिनांक: २५ ऑगस्ट, २०१४

बोधनकर साहेब,

आज सोमवार दिनांक २५ ऑगस्ट, २०१४ च्या महाराष्ट्र टाइम्सच्या अंकातील 'सगुण-निर्गुण' सदरातील 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी !' हा आपला लेख वाचला.

या लेखातील 'नारळाचे झाड' हे निरपेक्ष प्रेमाचे प्रतिक वाटले. नेहमी प्रमाणेच एक सुंदर आणि नाविन्यपूर्ण लेख आपण लिहला आहे. प्राणी असे प्रेम करतात हे माहित होते आणि अनुभवलेही होते परंतू एका वृक्षाकडून अशी भावना व्यक्त केली जावू शकते हे कधीच मनाला शिवले नाही. धन्य ते आपले वडील आणि धन्य ते 'नारळाचे झाड.'

जगदीशचंद्र बोस यांनी वृक्षांनाही भावना असतात हे सिद्ध केले होते हे माहित होते परंतू आपल्या माणसाच्या प्रेमाचीे परतफेड वृक्ष आत्महत्या करुन करेल हे अगदीच अनाकलनीय आहे.

या ठिकाणी आमच्या 'लाल्या' ची गोष्ट सांगितल्या शिवाय राहवत नाही. आमच्या भाऊंचे त्याच्यावर खुप प्रेम होते. त्याचं खानं-पिणं, आंघोळ घालणे भाऊच करायचे. भाऊ अपघातात वारल्यानंतर 'लाल्याने' अन्नपाणी सोडले आणि भाऊंच्या दहाव्याच्या दिवशी त्याने प्राण सोडला.

आजच्या पापी, स्वार्थी आणि विश्वासघातकी जगात 'लाल्याला' तो आमचा कुत्रा होता  हे म्हणायला सुद्धा मनाला खुप वेदना होत आहेत.

तर मला वाटते त्या नारळाच्या झाडाला 'सोयरे' म्हणणे देखील त्याचा अपमानच आहे. त्याला 'आई' किंवा 'देव' यापेक्षा समर्पक उपमा दूसरी नाही.

आपला हा लेख शाळेतील पुस्तकात 'धडा' म्हणून घालण्याच्या तोडीचा आहे या बद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.

आपल्या या लेखाबद्दल आपले त्रिवार धन्यवाद !!!

-रामदास पवार

लेखाचा दुवा (लिंक) खाली देत आहे. सर्वांनी अवश्य वाचावा !

http://maharashtratimes.indiatimes.com/edit/maza-adhyatma/vijayraj-bodhankar/tree/articleshow/40862264.cms

म्हशीची धडक?

दिनांक: ८ नोव्हेंबर, २०१४

काय काय जोक करतात हे पेपरवाले!
आजच्या मटाच्या FRONT PAGE-2 ला एक बातमी आहे.
(हाही एक जोकच. एकाच पेपरला दोनदोन मुखपृष्ठ)

"सुरतच्या धावपट्टीवर 'चांदी' आडवी" स्पाइस जेटच्या विमानाला म्हशीची धडक-विमानातील १४६ प्रवासी सुखरूप.

आता तुम्ही सांगा विमान म्हशीला धडक देईल की म्हैस विमानाला?

बातमीत आणखी यापूर्वीची एक घटना सांगितली आहे.

"जुलै २००९ मधे नागपुर विमानतळावरील रनवेवर किंगफिशर एअरलाइंसच्या विमानाला एका 'भटक्या' डुकराने धडक दिली होती.

म्हैस धडक देते. डुक्कर सुद्धा धडक मारतो आणि तोही 'भटका'
(यांचे संपादक घरात डुक्कर पाळतात वाटतं!)

वर प्रवासी सुखरूप पण म्हशीचे आणि डुकराचे काय झाले याचा काहीही उल्लेख नाही.

ह्या मनेका गांधी काय करत आहेत? मुक्या प्राण्यांवर......जाऊ द्या.

काही दिवसांनी अशी बातमी असेल का?
'पुणे-मुंबई रस्त्यावर पादचाऱ्याची डंपरला धडक!' -डंपर आणि डंपरचा चालक दोन्ही सुखरूप!

-रामदास किसकाढू पवार
अंबरनाथ

सुरतच्या धावपट्टीवर 'चांदी' आडवी

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/airport/articleshow/45077076.cms