रविवार, २७ सप्टेंबर, २०१५

देशातील उद्योजकांकडे दुर्लक्ष

दिनांक: भारतीय सौर ५ आश्विन शके १९३७,
२७ सप्टेंबर, २०१५

"पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मेक इन इंडिया'च्या नावाने जगभरातील उद्योजकांना आकर्षित करीत असताना देशातील उद्योगांकडे मात्र दुर्लक्ष करत आहेत. त्यांच्या दिड वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी देशातील उद्योजकांना काय दिले, असा परखड सवाल उद्योगपती राहूल बजाज यांनी शनिवारी नागपूर येथे केला."
(मटा बातमी, २७.९.१५)

फक्त पंतप्रधानच नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना सुद्धा माझा हाच सवाल आहे.
हे दोघेही 'काखेत कळसा आणि गावाला वळसा' घालत आहेत. भारतीय कंपन्यांना तर सोडाच पण भारतातीलच परदेशी कंपन्यांना सुद्धा उद्योग विस्तारासाठी हे जागा देऊ शकत नाहीत. मग आणखी परदेशी कंपन्यांना का हे उरावर बसवत आहेत. त्या परदेशी कंपन्या काय वेड्या आहेत भारतात यायला. त्यांना माहिती नसेल का की जागेचीे इथे किती मारामार आहे?

मुंब‍ई महानगर प्रदेशातील एमआयडीसीच्या एकाही म्हणजे मरोळ, ठाणे, नवीमुंब‍ई, तळोजा, तारापूर, पातळगंगा, डोंबिवली, कल्याण-भिवंडी, अंबरनाथ, अतिरिक्त अंबरनाथ, बदलापुर या औद्योगिक क्षेत्रात जागा शिल्लक नाही. पुढेही होऊ शकत नाही. कारण शेतकरी जागाच देत नाहीत. अतिरिक्त अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रासाठी १२०० एकर जागा घेण्याचे एमआयडीसीने ठरवले होते. पाटबंधारे विभागाने काही विरोध केला. काही शेतकर्‍यांनी. जागा ताब्यात आली फक्त दोनशे एकर. त्यातही काही शेतकऱ्यांनी पैसे घेतले आणि जमिनी ताब्यात दिल्या तर काहींनी पैसेही घेतले नाहीत आणि जमीनी सुद्धा अडकवून ठेवल्या. ताब्यात आलेल्या जमिनी पैकी १००-१२५ एकरचे वरिष्ठ पातळीवर वाटप झाले. परंतु अर्धे पैसे भरुन उद्योजक अडकले. दोन वर्षे होत आली तरीही जमीनी उद्योजकांच्या ताब्यात नाही आल्या. शेतकरी विरोध करत आहेत. जागेवर उभे सुद्धा राहू देत नाहीत उद्योजकांना.

हीच परिस्थिती पुणे विभागातील पिंपरी-चिंचवड, चाकण, रांजणगाव या औ. क्षेत्रांची आहे. नासिक विभागात सुद्धा तसेच.

वरील कोणत्याही विभागातील औद्योगिक क्षेत्रासाठी अर्जच स्विकारले जात नाहीत. कारण जागाच नाही. देणार कुठून?

मागच्या पाच वर्षांपासून अतिरिक्त अंबरनाथ क्षेत्रासाठी पाचेक हजार लोकांनी अर्ज केले, परंतु जागा शिल्लक नाही असे सांगून त्यांच्या अर्जांना केराची टोपली दाखवली गेली. एमआयडीसीकडे १५० एकर जमीन ताब्यात आली होती. ती लगेच वाटप झाली. आजही लोकांना जागा हवी आहे. पण जागा नाही.

पुण्यातील चाकण औद्योगिक क्षेत्रात कित्येक परदेशी कंपन्यांना त्यांचा जुना उद्योग वाढवण्यासाठी जागेची आवश्यकता आहे, परंतु देता येत नाही कारण जागेची कमतरता. आपल्याला आश्चर्य वाटेल परंतु तेथे ७ हजार अर्ज प्रलंबित आहेत. यात देशी तसेच परदेशी अशा दोन्ही प्रकारच्या कंपन्या आहेत.

एकवेळ पंतप्रधानांचे मी समजू शकतो की ते इतर राज्यांसाठी गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न करत असतील. त्यांच्या गुजरातमध्येच करोडो एकर जमीन देता येईल. परंतु उद्योगकांना महाराष्ट्रात जागा हवी आहे, असे नसते तर आनंदीबेन पटेल यांना महाराष्ट्रात येऊन उद्योजकांकडे झोळी पसरावी लागली नसती. "आम्ही मुंबई अहमदाबाद बुलेटट्रेन आणत आहोत. उद्योग गुजरात मध्ये काढा आणि बुलेटट्रेनने मुंबईला झोपायला या कारण मुंबई स्वप्ननगरी आहे. इथे स्वप्न पहा आणि गुजरातला प्रत्यक्षात आणा" अशी मखलाशी सुद्धा करावी लागली नसती.
पंतप्रधान आणि गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचे आपण समजू शकतो, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोणाला फसवत आहेत? कुठे जागा देणार आहेत? त्यांना वाटत असेल की ज्या उद्योजकांनी जागा घेऊन वर्षोनवर्षे त्यांचा वापर केला नाही त्या परत घेऊन त्या देऊ तर ते कोणत्या तरी नंदनवनात वावरत आहेत असे खेदाने म्हणावे लागते. कारण कोणीही उद्योजक अशा जमीनी ताब्यात देणार नाही. कोर्टात जाईल. निकाल जेव्हा लागेल तेव्हा सत्ताधाऱ्यांचाच निकाल लागलेला असेल.
महाराष्ट्रातील जागेची उपलब्धता याबद्दल माझे जर काही खोटे वाटत असेलतर कृपया www.midcindia.org या वेबसाइटवर जाऊन अर्ज करुन पाहावा. सद्यस्थिती आपल्या लक्षात येईल. हातच्या कंकणाला आरसा कशाला?

MT: उद्योजकांकडे पंतप्रधानांचे दुर्लक्ष
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/Ignore-the-Prime-Minister-of-the-country-industrialists/articleshow/49121462.cms?utm_source=MT&utm_medium=copyclip&utm_campaign=onpagesharing via @maharashtratimes

शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०१५

स्वातंत्र्य

दिनांक: २६ सप्टेंबर, २०१५

*अहिंसेच्या मार्गाने आपण स्वातंत्र्य मिळवू शकतो-गांधीजी

* स्वातंत्र्यासाठी रक्त सांडल्याशिवाय लोकांना स्वातंत्र्याचे महत्व कळणार नाही.- लोकमान्य टिळक

*तुम मुझे खुन दो, मैं आझादी दुंगा- नेताजी सुभाषचंद्र बोस.

* दे दी आझादी तूने खड़ग बिना ढाल, साबरमतीके संत तूने कर दिया कमाल- स्वातंत्र्यानंतर लोकांच्या मनावर बिंबवले गेले.

बापूंच्या अहिंसेने स्वातंत्र्य मिळाले आहे, असेच शिकवले गेले. स्वातंत्र्यासाठी लाखो लोकांनी रक्त सांडलेले आहे, हेच जर आपल्या लक्षात आणू दिले गेले नसेलतर स्वातंत्र्याचे महत्त्व लोकांना कळत नाही, असे म्हणणे म्हणजे  दांभिकपणाचा कळस आहे. यात लोकांची काहीही चूक नाही, याचा दाखला लो. टिळक आणि सुभाषबाबूंचे विधानेच देतात.

रविवार, १३ सप्टेंबर, २०१५

मटा, हा काय प्रश्न झाला?

दिनांक: १३ सप्टेंबर, २०१५

महाराष्ट्र टाइम्समध्ये मटा कौल म्हणून एक सदर असते. त्यात चालू घडामोडींबद्दल प्रश्न विचारून वाचकांचा कौल घेतला जातो. दोन दिवसांपूर्वी असाच एक प्रश्न विचारला होता.
'शाळा-काॅलेजात रामायण-गीता शिकवल्याने शैक्षणिक पात्रता वाढेल, असे वाटते काय?'

रामायण-गीता आणि शैक्षणिक पात्रता? काय संबंध? खरे पाहिले तर असा प्रश्न विचारून मटाला असे सिद्ध करायचे असावे की रामायण आणि गिता शिकवल्याने काही फरक पडणार नाही. शैक्षणिक पात्रता ही विज्ञान, व्यवस्थापन, कला यामुळे वाढेल हे कोणीही सांगेन.

परंतु मटाचे वाचक सुद्धा 'महा भयंकर' निघाले. जवळजवळ ५८ टक्के लोकांनी 'होय' असा कौल देऊन मटाला तोंडघशी पाडले.

प्रिय मटा संपादक,
तुम्ही डुलक्या काढता तशा वाचक काढतात असे कृपया समजू नका! आणि धर्माच्या नावाने दुही पेरू नका!
हाहाहा!

सोमवार, ७ सप्टेंबर, २०१५

कुमार सप्तर्षी

दिनांक: ८ सप्टेंबर, २०१५

कुमार सप्तर्षी …
नाव छान गोड वाटते. आवडते. मस्तच. कुमार काय? सप्तर्षी काय? भारीच भारी. पण माणूस नाही आवडत. गदाळ हे.
म्हणे, माणसाचा धर्म तो १८ वर्षाचा झाल्यावर त्यानेच स्वतःच ठरवावा. वा रे वा!
काहीही!