दिनांक : २५ जून, २०१५
विषारी दारूचे गेल्या दहावर्षातील महाराष्ट्रातील बळी २१९ आणि संपूर्ण दारूबंदी असलेल्या गुजरात मध्ये ८८२, हे असे कसे? दारूबंदी असताना गुजरात मध्ये इतके बळी जातातच कसे?
काय कारण असावे बरे? मोदी करिश्मा की आणखी काही?
आता तुम्ही म्हणाल की कायपण, मोदींचा इथे संबंध कुठे येतो? येतो येतो. थांबा सांगतो.
भारत बांग्लादेशाबरोबर एकदिवसीय क्रिकेट मालिका हरला. आमच्या घरातीलच एक नमोरुग्ण बोलतो, की पाकिस्तानला आयसीसी मालिकेतून हद्दपार करण्यासाठी मोदींनी हे करायला लावले आणि याचे स्ट्रेटेजीक प्लॅनिंग मोदीजी बांग्लादेशाला गेले तेव्हाच झाले होते. आता बोला. है कोई जवाब?
मी म्हणालो की आपण हरल्यामुळे पाकिस्तान कसे काय हद्दपार झाले. तर म्हणतो, की, आपण स्वतःहून हरल्यामुळे बांग्लादेशाचे आयसीसी रँकिंग वाढले. आयसीसी चॅम्पियनशिप मध्ये फक्त आठच संघ खेळू शकतात. बांग्लादेश आठव्या नंबरवर आला पाकिस्तना नवव्यावर गेले. म्हणून ते बाद. आणि चक्क त्याने मला टाळीही दिली हो.
म्हणून गुजरात मध्ये गेलेले विषारी दारूचे ८८२ बळी हे मोदींचे स्ट्रेटेजीक प्लॅनिंग का मानू नये? लोकांच्या मनात दारूविषयी भिती घालण्याचे. नमोभक्तांना पुड्या सोडता येतात तर अाम्हाला नाही का येणार?
(माहितीचा संदर्भ, मटा दृष्टीक्षेप २४/६/२०१५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा