मंगळवार, ३० जून, २०१५

तावडेसाहेब! संभाळा!

दिनांक: भारतीय सौर १० आषाढ शके १९३७, १ जुलै, २०१५

आमचे सरकार आले तर अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात तुरूंगात डांबणार, गजाआड करणार- विनोद तावडे, २०१४ विधानसभा निवडणूक प्रचार.

विनोद तावडे यांच्याकडे शिक्षण खात्याचा कारभार, गृहमंत्रालयाचा कारभार फडणवीस यांनी ठेवला स्वतःकडेच.-महाराष्ट्र मंत्रिमंडळ वाटप, आॅक्टोबर २०१४

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची इंजिनियरिंगची पदवी बोगस, पदवी दिलेल्या विद्यापीठाला सरकारची मान्यताच नव्हती. तावडेंनी निवडणूक आयोगासमोर केले खोटे शपथपत्र- जून २०१५

विनोद तावडेंना 'अागी'चे चटके, १९१ कोटींचे कंत्राट वादात, निविदा न मागवता तावडेसाहेबांनी अग्नीयंत्रांचे कंत्राट दिले.-मटा बातमी ३० जून १५

तावडेसाहेब! आपण काय करून बसलात हे? कोणाच्या नादी लागलात? माणूस पाहून तरी बोलायचे होते. राजकारणातील राजा ज्याला म्हणले जाते त्या प्रत्यक्ष शरद पवारांच्या पुतण्याला आपण धमकी दिली?
बरं दिली तर दिली, चुनावी जुमला म्हणून सोडून द्यायचे की नाही. तर तुम्ही बसलात सिंचन घोटाळ्यातील कागदपत्रे शोधत.

तुम्हाला शिक्षणमंत्री केले तेव्हाच तुम्ही हे समजायला पाहिजे होते. शिव्या खाण्याचे हे खाते आहे हे लक्षात यायला पाहिजे होते. तसे शिक्षण खात्यात आपण चांगले काम करत आहात. आम्हाला आता तरी तसेच दिसते आहे. परंतु ......

परंतु .... आता तुमच्या लक्षात आले असेल की काय राजकारण आहे? म्हणून सिंचन घोटाळ्यातील कागदपत्रे शोधायच्या भानगडीत पडू नका, मंत्रालयाच्या आगीत त्या सर्वच नस्ती (फायली) जळून नष्ट झाल्या आहेत. त्या शोधायचा प्रयत्न केल्यास तुमच्याच अशा बिनकामाच्या भानगडी बाहेर पडत राहतील.

म्हणून एक सांगतो. पटले तर बघा. अजित पवारांना गजाआड करू असे बोललो होतो पण तो एक 'चुनावी जुमला' होता, असे बेलाशक जाहिर करुन टाका. सिंचनात काही घोटाळा झालाच नाही असे जाहीर केले तर आणखी उत्तम. तसेच कसेही करून, अजितदादांच्या एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावून 'मी महिन्यातून दोन तिन वेळा दादांना फोन करुन त्यांचे मार्गदर्शन घेतो,' असे जाहिर करून टाका. सर्व अलबेल होईल.

(टिप: वरील लेखाचा खरे-खोटेपणाशी काहीही संबध नाही.)

रविवार, २८ जून, २०१५

भाजप-पार्टी विथ डिफरंस?

दिनांक: २८ जून, २०१५

ललित मोदी प्रकरणात 'अनीतीने' वागणार्‍या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे, 'निती' आयोगाच्या बैठकीला दिल्लीत उपस्थितच कशा राहू शकतात?
नीतिमत्तेला गहाण टाकलेल्या या बाईने कमीतकमी 'नीती' आयोगाचा तरी राजिनामा द्यावा की नाही? की नीती-अनीतीचा आता फरकच कळेनासा झालाय?

म्हणे पार्टी विथ डिफरंस! डोंबलं!

शुक्रवार, २६ जून, २०१५

मोदींची स्ट्रेटेजी!

दिनांक : २५ जून, २०१५

विषारी दारूचे गेल्या दहावर्षातील महाराष्ट्रातील बळी २१९ आणि संपूर्ण दारूबंदी असलेल्या गुजरात मध्ये ८८२, हे असे कसे? दारूबंदी असताना गुजरात मध्ये इतके बळी जातातच कसे?

काय कारण असावे बरे? मोदी करिश्मा की आणखी काही?

आता तुम्ही म्हणाल की कायपण, मोदींचा इथे संबंध कुठे येतो? येतो येतो. थांबा सांगतो.

भारत बांग्लादेशाबरोबर एकदिवसीय क्रिकेट मालिका हरला. आमच्या घरातीलच एक नमोरुग्ण बोलतो, की पाकिस्तानला आयसीसी मालिकेतून हद्दपार करण्यासाठी मोदींनी हे करायला लावले आणि याचे स्ट्रेटेजीक प्लॅनिंग मोदीजी बांग्लादेशाला गेले तेव्हाच झाले होते. आता बोला. है कोई जवाब?

मी म्हणालो की आपण हरल्यामुळे पाकिस्तान कसे काय हद्दपार झाले. तर म्हणतो, की, आपण स्वतःहून हरल्यामुळे  बांग्लादेशाचे आयसीसी रँकिंग वाढले. आयसीसी चॅम्पियनशिप मध्ये फक्त आठच संघ खेळू शकतात. बांग्लादेश आठव्या नंबरवर आला पाकिस्तना नवव्यावर गेले. म्हणून ते बाद. आणि चक्क त्याने मला टाळीही दिली हो.

म्हणून गुजरात मध्ये गेलेले विषारी दारूचे ८८२ बळी हे मोदींचे स्ट्रेटेजीक प्लॅनिंग का मानू नये? लोकांच्या मनात दारूविषयी भिती घालण्याचे. नमोभक्तांना पुड्या सोडता येतात तर अाम्हाला नाही का येणार?

(माहितीचा संदर्भ, मटा दृष्टीक्षेप २४/६/२०१५)

रविवार, २१ जून, २०१५

'योगा'योग!

दिनांक: २२ जून, २०१५

काल आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या थाटामाटात साजरा झाला. भारताच्या जगाला ज्या ज्या अनमोल देणग्या आहेत, त्या पैकीच ही एक भविष्यात गणली जाणार यात काडीमात्र शंका नाही.

मग या योगदिनाची आपण भारतीय टिंगल का करत आहोत? आपल्याला सर्वांनाच आनंद झाला पाहिजे. मला तर असे वाटते की असा आनंद सर्वांनाच मनातल्या मनात झाला आहे, असावा...

तरीही? तरीही असे का?टवाळी का? हा आंतरराष्ट्रीय 'कामसुत्रदिन' पाळला जावा असे टाइम्स आॅफ इंडिया मधील लेखात लिहले आहे. तर कोणी म्हणते की हा आंतरराष्ट्रीय 'भोगदिन' म्हणून पाळला तर कसे?

असे होण्याचे कारण आहे, आपले माननिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब. हो हो! तेच. ज्यांना 'आंतराष्ट्रीय डंका पिटण्याची' खोड लागली आहे. आज ते बोलणार नाहीत पण.... पण वेळ मिळाल्यास नक्कीच बोलतील, 'मेरे भाईयों और बहिनों, आपको मालूम होगा की, जो योगा सिर्फ भारतमेंही सिमित था (कचरे के कुडे में पडा था-मनातल्या मनात)  उसको हमारी (मैने-मनात) सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरपर पहचान दिलायी।"

कालच व्हाॅट्स‍अॅप वर मेसेज फिरत होते,

'Father's Day के दिन 177 देशों में योग करवा के भारत ने सिद्ध कर दिया के वो पूरी दुनिया का बाप है।'

'मोदींनी आज संपूर्ण जगातील १९३ देशातील लोकांना चट‍ई वर झोपण्यास भाग पाडले!'

अरे होप! होप! किती बोलताय? काय बोलताय? वय किती? बोलता किती?

तुम्हाला सगळं बोलण्याचा हक्क आहे, तर मग तो विरोधकांना का नसावा? जर लोक बोलले की 'गोळवरकर गुरूजींचा जन्मदिनच योगदिन का?' 'वाजपेयींचा जन्मदिनच जो नाताळाच्या सुट्टीच्या दिवशी येतो तोच सुशासनदिन का?'

तर.... नमोरुग्णको गुस्सा क्यों आता है? सन्नाटा क्यों छा जाता है भाई? टाइम्समधील एका स्टॅड‍अप काॅमेडियनच्या 'कामसुत्रदिन का नाही' या लेखाने बाजीराव शिंघम सारखी तुमची 'सटकते' कशाला? तुम्हाला 'राग का येतोय?'

तुमची अतिरंजित विधाने चालतात, मग विरोधकांची अतिरंजित विधानेही सहन करायला शिका हो भक्तांनो! मार्ग खडतर आहे. खाचखळगे येणारच!

तुम्ही जसे बोलाल तसे उत्तरे मिळतील, शेवटी 'जशास तसे' हा नियमच आहे?

योगाला कालच्या 'योगदिना'च्या अगोदरच आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणी पोहचवले असेलतर ते 'रामदेवबाबांनी!' असे माझे अगदी प्रामाणिक आणि निपक्ष मत आहे.

बाकी आजचे मोदीजींचे भाषण छान झाले बरं का. त्यांनी हे सांगितले की जगातील अनेक भूभागातील, अनेक रंगाच्या आणि अनेक परंपरा असणाऱ्या लोकांनी योगासाठी योगदान केले आहे. तसेच ज्या महापुरूषांनी, ऋषींनी-मुनींनी, योगगुरूंनी (रामदेवबाबा हसले), योग शिक्षकांनी, योग अभ्यासकांनी अनादि काळापासून योगाला माणले, वाढवले, विकास केला अशा महानुभाव लोकांना मी आदरपुर्वक नमन करतो आणि त्यांचा गौरव करतो, असेही आपले पंतप्रधान म्हणाले. याच गोष्टीवर कायम राहिले म्हणजे मिळवली! नमोभक्तांनी यातून बरेच शिकण्यासारखे आहे. खरं की खोटं?

जय योगा!

शुक्रवार, १९ जून, २०१५

बाहुबली छगन!

दिनांक: १९ जून, २०१५

बाहुबली™ छगन यांच्या तपासणीचे 'लोडशेडींग' सुरू ....

लवकरच एसीबीच्या चौकशीची 'बत्तीच गुल' होण्याची दाट शक्यता....

पवारसाहेब कधीही, केव्हाही अन कोणाचीही 'फ्यूज' काढून घेऊ शकतात आणि परत लावू ही शकतात...

पवार पाजी! तुस्सी ग्रेट हो!

™(भुज, भुजा म्हणजे बाहू आणि बळ म्हणजे बल म्हणून एकत्रित 'बाहुबली')

शिवसेनेला बाय! बाय! करणारे!

दिनांक: १७ जून, २०१५

शिवसेनेला 'रामराम' करणार्‍या लोकांचे जीवन 'हराम' होऊन जाते ब्बाॅ!

हा सेनेला 'बाय! बाय!' बोलण्याचा परिणाम की, सैनिकांची 'हाय! हाय!' लागल्याचा पुरावा?

सोमवार, १५ जून, २०१५

जाऊ नका! सुषमाजी!

भाजप आमदार, खासदार, आणि मंत्र्यांमध्ये सुषमा स्वराज हेच एक अभ्यासू, समजदार आणि विश्वसनीय व्यक्तिमत्त्व होतं! आहे!

आता ते ही जाणार म्हणल्यावर उरतोय फक्त पाला पाचोळा....
गडबडगुंडा, बडबडस्वामी, चुलबुलसाध्वी आणि फेकूsssssssssभाई!

अच्छे दिन?

शनिवार, १३ जून, २०१५

वासना एक समस्या!

वासनेला चटावलेले पुरूषच!
सगळेच!

आँखो में सेक्स!
बातो में सेक्स!
सोच में सेक्स!
मेसेज में सेक्स!
फोटो में सेक्स!
कमेंट में सेक्स!
व्हिडिओ में सेक्स!
जसे भादव्यातील अधीर........

अपवाद हिजड्यांचा!
हॅटस् ऑफ टू हिजडे!

(फेसबुकवरील अशा लोकांना समर्पित)

बाहेरील पुरूषांनी शेजारी-पाजारी, बस स्टाॅपवर, लोकल्यच्या महिलांच्या डब्याशेजारी खिडकीत, गर्दीत आपली सवय चालू ठेवावी!   WhatsApp असेलच दिमतीला?  सुधरणे तुमच्या आवाक्याबाहेरचे आहे! तुम्ही स्वत:लाच समर्पित रहा!

हाहाहा! लगी क्या?

शुक्रवार, १२ जून, २०१५

विजेची बचत हिच विजेची निर्मिती!

दिनांक: १२ जून, २०१५

एक मंत्री प्रवास करत असताना त्यांना एका खेड्यात एक मोठा सरकारच्या जाहिरातीचा बोर्ड दिसतो. त्या बोर्डवर लिहलेले असते,

'विजेची बचत हीच,
विजेची निर्मिती!'

मंत्री खुष होतात आणि गावातील लोकांना भेटण्यासाठी गाडी गावात थांबवतात. सर्वच गावकरी जमा होतात.

मंत्र्यांनी गावकऱ्यांना विचारले,
'बोर्ड वाचला का?'
गावकरी म्हणाले, 'काय लिहलंय त्यावर?'
'वाचता येत नाही तुम्हाला?'
म्हणाले, 'नाही!'
'गावात कोणालाच वाचता येत नाही?'
म्हणले, 'नाही!'
विचारले, 'गावात शाळा नाही का?'
'नाही!'
गावात शाळा नाही, कोणाला वाचता येत नाही आणि बोर्डतर लागलेला आहे. मंत्री जरा नाराज झाले आणि गावकऱ्यांना म्हणाले, 'अहो, असं काय करता? जग कुठं चाललंय!'
गावकरी म्हंटले, 'कुठे चाललंय?'
'अहो, असं करू नका, शाळा काढा.
गावकरी म्हणाले, 'कशाला?'
'पोरे शाळेत जातील!'
'मग काय होईल?'
मंत्री म्हणाले, 'पोरे शिकतील!'
'मग काय होईल?'
'त्यांच्या ज्ञानात वाढ होईल!'
गावकरी म्हणाले, 'बरंच आहे असे अडाणी, निदान शेतात तरी कामाला येतात. नाहीतर शिकून कुठे नौकर्‍या मिळतात?'
मंत्री म्हणाले, 'असं करू नका हो, शाळा काढा, पोरांना शाळेत घाला, पोरांना शिकवा, त्यांच्या ज्ञानात वाढ होईल!'
पाचसहा वेळी मंत्री म्हणाले, त्यांच्या ज्ञानात वाढ होईल, त्यांच्या ज्ञानात वाढ होईल.
गावकरी चिडले आणि म्हणाले, 'मंत्री महोदय! आमच्या गावाने ठरवलंय, शाळा काढायची नाही, शिकायचं नाही, ज्ञानात वाढ अजिबात करायची नाही कारण,

ज्ञानाची बचत हीच ज्ञानाची निर्मिती आहे!'

(सौजन्य!: रामदास फुटाणे, युट्युब वरून)

सबसे तेज तर्रार, फडणवीस सर्कार?

दिनांक : ६ जून, २०१५

मॅगी नुडल्समध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट (एम‍एसजी) आणि शिसे यांचे प्रमाण अधिक असल्याचे सिद्ध होऊन पंधरा दिवस झाले. या रसायनांमुळे किडणी निकामी होऊ शकते. कर्करोग होऊ शकतो. इतके घातक असतात.

*मॅगीला दिल्ली, तामिळनाडू, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, गुजरात या राज्यांनी हद्दपार केले आहे.

*केरळ सरकारने तर मॅॅगीवर बंदी घालत राज्यभरातील पाकिटे जप्त करण्याची कारवाई २ जुन पासूनच सुरू केली होती.

*सिंगापूर सरकारने भारतात तयार होणाऱ्या मॅगीवर लगेच बंदी आणली आहे.

*शहाणपणा दाखवून खुद्द मॅगीचे उत्पादन करणाऱ्या नेस्ले कंपनीने भारतातील सर्वच मॅगीची विक्री थांबवली आहे...

हे सर्व घडत असताना......

महाराष्ट्र एफडीएने मुंबई, पुणे व नागपूर येथून मॅगीचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. ते ही पंधरा दिवसांपूर्वी.
(ही महत्वाची शहरे सोडून इतर ठिकाणची लोकं आजारी पडले काय आणि मेले काय? एकच!)
त्या नमुन्यांची तपासणी मागच्या पंधरा दिवसांपासून  मुंबई व पुणे येथील प्रयोगशाळांमध्ये सुरू आहे. सुरूच राहणार आहे. नेस्लेने सर्व मॅगीचे पाकिटेच परत घेतले आहेत तर आता तपासणी करून काय फायदा?  हे म्हणजे 'वराती मागून घोडे' असे चालले आहे. बैल गेला तरी झोपा अजूनही चालूच आहेत.
म्हणूनच म्हणावेसे वाटते....

वा! वा! काय सरकार आहे!

सबसे तेज तर्रार,
फडणवीस सर्कार!

रामदास पव्वार!
-अंबरनाथ
(६ जून २०१५)

संदर्भ :
‘मॅगी’बंदीची व्याप्ती वाढली
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Maggi/articleshow/47547276.cms  via @maharashtratimes
(मटा, ५/६/२०१५)

खाद्यसुरक्षेचे पोकळ दावे उघड
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/Food-Security/articleshow/47547107.cms  via @maharashtratimes
(मटा, ५/६/२०१५)

देशभरातील दुकानांमधून 'मॅगी'ची माघार!
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Nestle-takes-Maggi-off-the-shelves/articleshow/47549738.cms  via @maharashtratimes
(मटा आॅनलाइन ५/६/२०१५, )

खुदकी बरबाबी!

जब हमने ही खूदको बरबाद करनेकी ठान ली हैं,
तो भगवान हमको आबाद करने का सोच भी कैसे सकता है?

द्वेष विसरा!

दिनांक: ९ जून, १०१५

एकमात्र खरे की, ब्राम्हणांनी भूतकाळात सामाजिक न्यायाबाबत केलेल्या चुका गंभीर असल्या, तरी इतिहासातील मढी उकरून काढून ब्राम्हण समाजाला उठसूठ आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यातही कुठलेच सामाजिक शहाणपण नाही. ब्राह्मण समाज भलेही दलितांबाबत अनास्था दाखवीत असेल; तरीही हा समाज दलितांची घरे-दारे पेटवली पाहिजेत, त्यांच्यावर अत्याचार केले पाहिजेत, या मताचा मुळीच नाही हे त्रिवार सत्य आहे. ब्राम्हण समाजातील बुद्धिजीवी -विचारवंत वर्ग दलितांना सामाजिक न्याय मिळाला पाहिजे याच मताचा आहे.
(बी. व्ही. जोंधळे, पुरोगामित्व, जातिव्यवस्था आणि कसबे, मटा, ९/६/२०१५)

अहो! हे सर्व समजतंय तर द्या की सोडून ब्राम्हणांवर पुराणकालिन आरोप करीत करीत जगणे. एक औरंगजेब हिंदूद्वेषी होता म्हणून सर्वच मुस्लिम हिंदूद्वेषी होत नाहीत अाणि अकबर सहिष्णू होता  म्हणून सर्वच मुल्लिम सहिष्णू होणे शक्य नाही.  इतिहासातील मढी उकरून काहीच हाताला लागणार नाही. 'गेलेले दिवस' महिलांचेच काय कोणाचेच परत येत नाहीत. जो द्वेषाने जळतो तो स्वतःचेच आयुष्य जाळून घेत असतो, आणि त्यातच त्याचे रामनाम सत्य होते.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!

रामदास पवार
-अंबरनाथ

पोकळ घोषणाबाज फडणवीस सरकार!

दरोडेखोर, मुलीचा विनयभंग करणाऱ्या आणि  आश्रमाची तोडफोड करून  सामूहिक दहशत पसरवणार्‍या राष्ट्रवादीच्या बदलापुरच्या साध्या नगरसेवकाला हे फडणवीस सरकार पकडून गजाआड करू शकत नाही, ते अजित पवारांना काय गजाआड करणार?

हाहाहा!

पोकळ घोषणाबाज फडणवीस सरकार!

Attention: मानिनय मंत्री विनोद तावडेसाहेब! हे तरी जमतंय का बघा राव! विनोद नाव सार्थ करू नका!

'विश्वविक्रमी ६० तासांचे भाषण'

'विश्वविक्रमी ६० तासांचे भाषण'

हा मथळा मटामध्ये मी वाचला आणि एक व्यक्ती माझ्या डोळ्यांसमोरुन जाईनाच!

त्यामुळे बातमी वाचताही नाही आली.

सांगा बरे कोण व्यक्ती दिसली असेल मला?

मोदींच्या परदेश वार्‍या!

गेल्या वर्षभरात मोदीजी संपूर्ण जग फिरले. मोठमोठया गुंतवणूकीचे करार-मदार केले. पण तरीही हवी तशी विदेशी गुंतवणूक भारतात आलेली नाही.

परदेशी लोकांना सुद्धा मोदीजी 'फेकू' वाटतात की काय?

#भाबडा_प्रश्न

आस्तिक-नास्तिक

मी सतत अस्तिकता आणि नास्तिकता यांच्या सीमेवर बसलेला असतो. थोडेही इकडे किंवा तिकडे होत नाही.

असेलतर दोघांचाही नाहीतर कोणाचाही नाही. बाजू घेतली तर, अस्तिका समोर नास्तिकतेची आणि नास्तिकासमोर अस्तिकतेची घेतो.  दोघांचीही बाजू खुप हिरारीने घेतो.  पण तरीही कोणीही मला आपले मानत नाही.
मी एक लवंडतं बिनबुडाचं गाडगं आहे.

लोकप्रिय निर्णय मुद्दाम टाळले-मोदी

दिनांक: २९ मे, २०१५

'लोकप्रिय निर्णय मुद्दाम टाळले!' असे मोदीसाहेब जेव्हा म्हणतात तेव्हा हे ही लक्षात येते की, जनधन योजना, विमा योजना, सुकन्या योजना, अटल पेंशन योजना हे लोकप्रिय निर्णय नाहीत. 

तसेच या विधानातून मोदींनी हे ही मान्य केले की 'अच्छे दिन' अजूनही आलेले नाहीत. शब्बाश! मोदीसाहेब! तेव्हढे तुमच्या फक्तांना सांगा बरे! फुकटची फुशारकी मारत बसतात. यँव केलं अन तँन केलं!

लोकप्रिय निर्णय मुद्दाम टाळले!
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/modi-gov/articleshow/47464550.cms  via @maharashtratimes

अमित शहा यांना मनकी बात-१

अमितजीओ अमितजी!

दिनांक : २८ मे, २०१५

प्रिय जुमले फेम अमितसाहेब!
आपल्याला कोपरापासून नमस्कार!
आपल्याला 'जुमले फेम' म्हणालो म्हणून कृपया राग मानू नये. महाराष्ट्रातील जनतेने आपल्याला खुप 'नावे ठेवली' आहेत. त्यापैकी हे एक आहे. 'जुमलेदार!'

आपण काल म्हणालात की 'वेगळे विदर्भ राज्य करण्याचे आश्वासन आम्ही कधीही दिले नव्हते.' याबद्दल आपले शतश: आभार आणि अनेक धन्यवाद. कधीकधी वाईटातून चांगले निघते असे म्हणतात. तसे याबाबतीत झाले आहे. नाहीतरी ही गोष्ट तुमच्या आवाक्क्यातील नाही हे आम्हा मराठ्यांना माहित होते. 'देर आये, दुरुस्त आये!' हेच खरे आणि उत्तम. याचा अधिक उहापोह मी करत नाही. जास्त खोलात शिरत नाही. कारण आम्ही कशाला सिद्ध करायला जाऊ की तुम्ही कोणीतरी भाजपेयी असे बोलले होते. कारण वेगळा विदर्भ तुम्ही करू शकत नाही यातच आमचा आनंद सामवलेला आहे.

राममंदिर, समान नागरी कायदा, कलम बद्दल मी सविस्तर लिहिनच.

कळावे, लोभ असावा!

अंशतः आपला!

रामदास पवार
-अंबरनाथ