दिनांक : २५ नोव्हेंबर, २०१५
हो! हो! भारत १००% असहिष्णू झाला आहे, असे मला वाटते आहे.
अमिर खानच्या बिचार्या बालिश बायकोने एक साधा प्रश्न विचारला, की आपण देश सोडून जाऊ या का म्हणून. तर अमिर खानने तेव्हढ्याच निरागसपणे मिडियाला हा प्रश्न सांगितला. त्यात त्याचे काय चुकले? त्यासाठी एव्हढा गदारोळ माजला याचाच अर्थ भारत असहिष्णू झाला आहे. कोणालाही आपले मन मोकळे करण्याची मुभा देणे म्हणजे सहिष्णुता आहे. हो की नाही?
दुसरी गोष्ट म्हणजे बरेच लेखक आपले पुरस्कार परत करत आहेत. त्यात एव्हढे वाईट वाटण्यासारखे काय आहे? नाही आवडत त्यांना भाजप सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, साक्षी महाराज आणि बरेच लोक. त्यांना काँग्रेस जवळची वाटते हा काय गुन्हा आहे काय? नाही ना? मग त्याचा इतका गवगवा कशाला? ते तर आपले पुरस्कार शांततेने परत करत आहेत. त्यांनी काही जाळपोळ, तोडफोड, खुन, मारामाऱ्या केल्यात की दहशतवाद माजवलाय? त्यांना भारताचे वातावरण असहिष्णू वाटतंय तर वाटतंय. लोकशाही आहे. कोणालाही काही वाटण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे. अशा लोकांना देशद्रोही ठरवणे म्हणजे असहिष्णूता नाहीतर दुसरे काय आहे?
म्हणून मला वाटते भारताचे वातावरण असहिष्णू आहे. मला कोणी परदेशात पाय पण ठेऊ देणार नाही, नाहीतर ....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा