दिनांक: ४ आॅक्टोबर, २०१५
बिहारच्या निवडणूकीत भाजपचे 'दिल्लीपत' व्हावे. दिल्लीला तिन सिट मिळाल्या. त्यामुळे भाजपचे आमदार तिन आसनी रिक्षातून विधानसभेत जाऊ शकतात. ज्या दिल्लीत लोकसभेच्या निवडणूकीत भाजपला सर्वच्यासर्व सर्व म्हणजे सातही जागा मिळाल्या, त्याच दिल्लीत भाजपला ७० पैकी फक्त ३ जागा जिंकता आल्या. सहा महिन्यात भाजपची अशी अधोगती झाली याला भाजपचा मुजोरपणा कारणीभूत होता. त्याची फळे भाजपला मिळाली.
आता बिहारच्या निवडणूका आहेत. बिहारमध्ये जागा अधिक आहेत. म्हणजे दिल्लीपेक्षा अधिक. म्हणून त्यांना सहा सिट मिळाव्या. त्यामुळे भाजपच्या अामदारांना सहा सिटर रिक्षा वापरता यावी. भाजपच्या बर्याच लोकांची चरबी उतरावी. असे वारंवार का वाटते आहे, कळत नाही.
तसे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १ लाख २५ हजार कोटी रूपयाचे पॅकेज जाहीर केले. ते असे केले जसे बिहारचा लिलाव चाललाय. भाषणात ते म्हणाले, 'की भाईयों, आपको कितना पैसा चाहिए बोलो. साठ हजार करोड? सत्तर हजार करोड? अस्सी हजार करोड? नब्बे हजार करोड? मै पुरे सव्वासो हजार करोड रूपया बिहारको देता हुँ।" बिहारला मागच्या वर्षी पुर आला होता तेव्हा काश्मीरला गेले पण बिहारला मदत केली नाही. भाजपच्या लोकांना लोकसभेत बहुमत मिळाल्यापासून गर्व झाला आहे. हे गर्वाचे घर खाली व्हावे म्हणून वाटते फक्त सहाच जागा मिळाव्या.
आता भक्त मला म्हणतील, 'कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.' तर काही म्हणतील, 'दुसर्याचे वाईट चिंतने सदृढ मनाचे लक्षण नाही.'
म्हणू देत. मला वाटतं ते लिहलं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा