दिनांक: ९ नोव्हेंबर, २०१५
बिहार निवडणुकीत भाजपला घवघवीत यश. विरोधकांचे दात घातले त्यांच्याच घशात. जे विरोधक भाजपला फक्त ६ जागा मिळाव्या म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते, त्यांना दिली एक सणसणीत चपराक. ६ च्या ठिकाणी ५३ जागा मिळवून दाखवल्या. लालू प्रसाद, काँग्रेस आणि नितीशकुमार यांची अभद्र युती झालेली असताना हे यश विशेष उल्लेखनीय आहे, यात तिळमात्र शंका नाही. विरोधक आता तोंड लपवून बिळात जाऊन बसले आहेत.
हाहाहा! मोदीजी और अमितजी तुसी ग्रेट हो!
©रामदास पवार
अंबरनाथ
(९ नोव्हेंबर, २०१५)
ज्यावेळी बिहार निवडणूकीचा निकाल लागला तेव्हा भाजपला बहुमत तर नाहीच परंतु खुपच कमी जागा मिळाल्या. त्यावेळी भक्त म्हणायला लागले की, मोदीजी एकलव्यासारखे एकटे बिहारमध्ये लढले. भाजप विरोधात लालू, नितिशकुमार, काँग्रेस एकत्र आले म्हणून भाजपचा पराभव झाला. बिहारचे लोक अडाणी आहेत. त्यांना जंगलराजच पाहिजे. लालूने नितिशकुमार यांना जरी मुख्यमंत्री बणवले असलेतरी खरा वचक लालूचाच राहिल कारण लालूला जास्त जागा मिळाल्या आहेत. या निवडणूकीने भाजपच्या गोटात बराच गोंधळ उडाला. अडवाणी, जोशी, शत्रुघ्न सिन्हा हे नाराज झाले.
वरील पोस्ट टाकण्यापुर्वी ४ आॅक्टोबरला खालील पोस्ट फेसबुकवर टाकली होती. ती पोस्ट मी पुन्हा वरील पोस्ट बरोबर शेअर केली. ती पुन्हा खाली देत आहे.
बिहारच्या निवडणूकीत भाजपचे 'दिल्लीपत' व्हावे. दिल्लीला तिन सिट मिळाल्या. त्यामुळे भाजपचे आमदार तिन आसनी रिक्शातून विधानसभेत जाऊ शकतात. बिहारमध्ये जागा अधिक आहेत. म्हणून त्यांना सहा सिट मिळाव्या. त्यामुळे भाजपच्या अामदारांना सहा सिटर रिक्षा वापरता यावी. भाजपच्या बर्याच लोकांची चरबी उतरावी. असे वारंवार का वाटते आहे, कळत नाही.
आता भक्त येतील आणि मला म्हणतील, 'कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.' तर काही म्हणतील, 'दुसर्याचे वाईट चिंतने सदृढ मनाचे लक्षण नाही.'
म्हणू देत. मला वाटतं ते लिहलं.
रामदास पवार
अंबरनाथ
(४ आॅक्टोबर, २०१५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा