दिनांक: २ डिसेंबर, २०१५
हेरगिरी रॅकेटमध्ये पाकिस्तानी कर्मचारी-मटा बातमी
बघा हा आपला महाराष्ट्र टाइम्स. मुंबईचे नं. १ मराठी वृत्तपत्र. बातमीचा मथळा काय दिलाय पहा. 'हेरगिरी रॅकेटमध्ये पाकिस्तानी कर्मचारी.' या बातमीत आयएसआयचे एजेंट असल्याच्या आरोपात दोन जणांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची नावे आहेत कफैतुल्ला खान आणि बीएसएफचा हेड कॉन्स्टेबल अब्दुल रशीद. या दोघांपैकी कोणीही पाकिस्तानी कर्मचारी नाही. दोघेही भारतीय आहेत. त्यांचा हात हेरगिरीत आहे आणि ते पाकिस्तानच्या आयएसआय साठी हेरगिरी करत होते म्हणून पकडले गेले आहेत. यातील कफैतुल्ला खान याने पोलिसांना सांगितले की त्याला पाकिस्तानमध्ये बोलावले होते आणि त्यासाठी विसासाठी भारतातील पाकिस्तानच्या उच्चायुतातील एका कर्मचाऱ्याची मदत घेण्यास सांगितले होते. ज्याचे नाव याला माहित नाही.
वरील बातमीत महत्वाचे काय आहे? पकडले लोक की ज्याचे नावही माहित नाही असा पाकिस्तानी कर्मचारी? ज्याला अटक केली तो बातमीचा मथळा होईल की ज्याचे नाव माहित नाही, जो अजून अंधारात आहे, त्याचा मथळा होईल? त्यात ही बातमी मटाला महत्वाची वाटली नाही म्हणून शेवटच्या पानावर छापली आहे ती कोपऱ्यात. बातमीत इतका संभ्रम निर्माण केलाय की अपराधी कोण आहे, हेच कळणार नाही.
का केले असावे असे महाराष्ट्र टाइम्सने? तुम्हाला आणखी एक सांगतो. मागच्या ७ दिवसात हेरगिरीच्या आरोपाखाली एकून ६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अशी बातमी एनडीटिव्हीने दिली आहे.
वरील दोघे आणि मेरठ मधून मोहम्मद एजाज, कोलकत्यामधून इरशाद अंसारी, त्याचा मुलगा अश्फाक व नातेवाईक मोहम्मद जहांगीर असे एकून सहा. सहा चे सहा मुसलमान आहेत. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे यातील अब्दुल रशीद हा बिएसएफचा सैनिक आहे. तो भारतीय स्थलसेना आणि वायूसेनेचे गुपित दस्तऐवज पुरवत होता. दोन वर्षांपासून ते हेरगिरी करून आयएसआयला माहिती पुरवत आहेत.
आता प्रश्न हा उरतो की महाराष्ट्र टाइम्स हे का लपवतो आहे? आहेत भारतीय मुस्लिम पाकिस्तानचे एजेंट तर आहेत, त्यात लपवून काय मिळणार आहे? कोंबडं झाकून ठेवले म्हणून आरवायचे थांबत नाही हे मटाला माहित नाही काय?
म्हणजे 'मुसलमानांचे ठेवायचे झाकून आणि हिंदूंचे पाहायचे वाकून' यालाच तर सहिष्णुता म्हणत नसावेत?
मीही तुम्हाला सांगतो की, हे ६ जण देशद्रोही निघाले म्हणून सगळेच मुसलमान असे असतात हे समजू नका. मनात काही वाईट वक्टे आणू नका. परमवीरचक्र अब्दुल हमिदला आठवा.
जय सहिष्णुता! जय हिंद!
हेरगिरी रॅकेटमध्ये पाकिस्तानी कर्मचारी
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Technology-drove-Master-Raja-into-police-web-Heres-all-you-need-to-know-about-the-ISI-spy/articleshow/49990264.cms?utm_source=MT&utm_medium=socialplatformname&utm_campaign=onpagesharing via @maharashtratimes: http://app.mtmobile.in
भारत की जासूसी के लिए बीएसएफ और पुलिस में आईएसआई के एजेंट, दो गिरफ्तार
http://m.ndtv.com/khabar/isi-agent-in-indias-bsf-and-police-for-spying-two-arrested-1249378
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा