दिनांक : २८ नोव्हेंबर, २०१५
महाराष्ट्र टाइम्स मध्ये डाॅ. राजन भोसले वाचकांच्या पत्राला उत्तरे देतात. एकाने प्रश्न विचारला की "माझ्या बायकोने मला सांगितले की, तिचे लग्नाअगोदर एका मुलावर प्रेम होते. तेव्हापासून मला तिचा संशय यायला लागला आहे. तिचं चारित्र्य शुद्ध नसल्याची भावना मनात सतत येत राहते. कशातच स्वारस्य वाटत नाही."
डाॅक्टरांनी त्यांना समजावून सांगितले की, 'यौवनात सर्वानाच आकर्षण निर्माण होते. तुम्हालीही झाले असेलच. बायकोने तुम्हापासून काही लपवले नाही म्हणजे उलट तिचा तुमच्यावर खुप विश्वास आहे असे दिसते आहे. म्हणून काहीच वाईट विचार मनात न आणता सुखाने संसार करा."
ह्या लेखाच्या शेवटी वाचकांनी सुद्धा प्रश्नकर्त्याचे शंका निरसन केले आहे. ते वाचून त्या बिचाऱ्याने हसावे, रडावे की आणखी काय करावे हे तुम्हीच ठरावा.
कडक बेधडक म्हणतात,
"मुली म्हणजे, मी नाही त्यातली कडी लाव आतली, अशाच असतात..."
पृथ्वीवरील साहेबराव साहेब म्हणतात,
'आधी कितीही लफडी करायची मग लग्नावेळी पैशावाला मुलगा हेरायचा, असेच मुली करतात'
ललित पाटील म्हणतात,
"एखाद्या वेळेस असे होऊ शकते. शरीरसंबंध देखील येऊ शकतात. पण स्वभाव चांगला हवा. एखादे गंभीर स्वरूपाचे प्रेम प्रकरण असणे वेगळे आणि तीनचार लफडी असणे वेगळे. लग्नाअगोदर तीनचार लफडी असतील तर मात्र तुमचे अवघड आहे."
एक अनामिक म्हणतात,
"ही किर्कोळ गोष्ट, लग्ना नंतरही काही बायका प्रेम नाही पण दुसर्या पुरुषाचा अनुभव घेतात."
राजेंद्र शहा म्हणतात,
"चालू ठेवा पोरगी खरी आहे!"
आझाद हिंद सांगतात-
"अजिबात संशय करायचा नाही. नशिबाने जे भेटला, त्यात खुष राहायचा. जय हिंद!"
पाहिलं ना मराठी माणूस फुकटचे सल्ले देण्यात किती वाकबगार आहे ते?
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4108373.cms
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा