सोमवार, ७ डिसेंबर, २०१५

शनैश्चर कृतां पीडां न कदाचित् भविष्यति

दिनांक: ७ डिसेंबर, २०१५

ज्यांचा देवावर विश्वासच नाही तेच लोक महिलांना शनीच्या मंदिरात प्रवेश मिळालाच पाहिजे, असा हट्ट धरून बसले आहेत. भांडत आहेत. झगडत आहेत.

ज्या महिलांना शनीच्या कोपाची भीती वाटत नाही त्याच शनी शिंगणापुरच्या शनी चौथऱ्यावर जातील. ज्या महिला जातील त्यांनाच त्याची फळे भोगावी लागतील. (खरेखोटे शनीच जाणो) मग त्यात इतरांनी लुडबुड करण्यात काय हाशील आहे? ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल ही म्हण लोक विसरले काय?

जे लोक दुधाचा अभिषेक करून शनी देवाला शुद्ध करत आहेत त्यांचा खुद्द देवावरही विश्वास नाही असे वाटते. देव अशुद्ध होऊच कसा शकतो? ज्या दुधाचा अभिषेक केला जातो ते शुद्ध असते, असे समजणे खुळेपणाचे लक्षण आहे.

भारत म्हणजे जगातील सर्वात मोठा लोकशाही गोंधळ आहे.

खंडेराया आमचे कुलदैवत असूनही मी अजूनही जागरण गोंधळ घातला नाही म्हणून, मी या सर्व गोंधळात एकदम न्यूट्रल आणि अलिप्त आहे!

ॐ शं  शनैश्चराय नमः

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा