दिनांक: २३ जुलै, २०१५
एका एमबी (MB) चे किती वजन असतो हो? कोणाला माहित आहे का? मी जसजसे फोनमध्ये नविन नविन अॅप्लिकेशन टाकतोय, तसतसे माझ्या फोनचे वजन वाढत चालले आहे. मी अधाश्यासारखे गुगल प्ले बुकवर फुकटचे पुस्तके डाउनलोड करतो आहे. तेच ६०० एमबीचे झाले आहेत. एव्हढेच कशाला मी तर चारपाच मराठी-इंग्रजी-मराठी शब्दकोष डाउनलोड केले आहेत. फुकटचे आहेत ना! मग काय? कशाला सोडायचे?
असेच खुप अॅप्लिकेशन आहेत. जे मला फोनमधून काढावे वाटत नाहीत. पण म्हणूनच फोनचे वजन वाढत चालले आहे. संगणकशास्त्र खुप पुढारले आहे म्हणतात. मग यांना केबी, एमबी, जीबीचे वजन कमी करायला जमत नाही का? म्हणे नॅनो टॅक्नाॅलाॅजी आली आहे!
त्यांचे जाऊ द्या. आपल्यातील कोणीतरी यातील जाणकार मार्गदर्शन करील का? एमबीचे वजन कमी कसे करायचे? मी त्याचा आयुष्यभर ऋणी राहीन.
रामदास पवार
-अंबरनाथ
(२३ जुलै, २०१५)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा