दिनांक: २१ फेब्रुवारी, २०१६
हा फोन तुम्हाला २५१ रुपयात मिळणार आहे. जसा स्मार्ट फोन दिसायला असतो तसाच हा ही असेल. या फोनच्या मुख्य स्क्रीनवर तुम्हाला वेगवेगळी अॅप्लीकेशन दिसतील. त्यात ब्राऊजर सुद्धा असतील. अशी सातआठ स्क्रीन वेगवेगळ्या अॅप्लीकेशनने भरलेले असतील. कोणत्याही ब्राऊजर वर क्लिक केल्यावर जसे होमपेज दिसते तसेच दिसेल. फक्त तुम्हाला काही शोधायचे असेल तर यातले अॅप्लीकेशन फक्त शोधता येतील. फेसबुक शोधले की फेसबुकच्या टाइमलाइनचा फोटो तुम्हाला दिसेल. म्हणजे कोणीही म्हणू शकणार नाही की हा तुमचा खोटा फोन आहे. सर्व अॅप्लीकेशनचे असेच एकेक फोटो असतील. या फोन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाॅलपेपर सुद्धा असतील.
हा या फोनची काॅलर ट्युन मध्येमध्ये वाजत राहील. तुम्ही बाजूला जाऊन फोनवर खोटेनाटे काही बोलू शकता. किंवा हा माणूस खुपच त्रास देतोय असे समोरच्याला सांगून फोनची रिंग बंद करू शकता. कोणी शंका घेतलीच तर आपण हा फोन उघडून त्या शंकेखोराला दाखवू शकता. कारण त्यात बॅटरी, सिमकार्ड स्लाॅट, मेमरी कार्ड स्लाॅट सर्वच दिसेल.
वाॅलपेपर बदलण्यासाठी किंवा अॅपवर क्लिक केल्यावर त्या अॅपची स्क्रीन येण्यासाठी एक लपवलेले फिरते बटण असेल. जे दुसर्या कोणाला दिसणार नाही.
थोडक्यात काय तर गरिबातल्या गरिबाला आपल्याकडे स्मार्ट फोन आहे याचा आनंद मिळेल, तोही फक्त २५१ रुपयात. ६ कोटी लोकांनी हा फोन बुक केला आहे. हे सहा कोटी लोक येत्या चारपाच महिन्यात फोन त्यांच्या हाती आल्यावर धमाल उडवून देणार आहेत. मजाच मजा.
अरे हो एक सांगायचे राहिले. यात सेल्फी काढता येईल पण फक्त एकाचा. म्हणजे स्वतःचाच. खोटा खोटा. सेल्फी काढताना फक्त क्लिक असा आवाज होईल. एकापेक्षा जास्त लोक जर सेल्फी मध्ये घ्यायचे असतील त्या सर्वांकडे फ्रीडम २५१ असला पाहिजे. म्हणजे 'एकमेका साह्य करू, अवघ्यांना बणवू मुर्ख' हे त्यांचे ब्रीद पूर्ण करता येईल.
फ्रीडम २५१ चा विजय असो!
जय हो मेक इन इंडिया!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा