मंगळवार, १८ ऑगस्ट, २०१५

सव्वा लाख कोटी?

दिनांक: १९ आॅगस्ट, २०१५

बिहारच्या निवडणूका आल्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना कान टवकारून ऐकायला सांगितले. बिहारमधील भाषणात. सभेला उपस्थित असलेल्या लोकांना. तर तुम्ही ही कान स्वच्छ करून ऐका. सव्वा लाख कोटी रूपये पंतप्रधानांनी बिहारच्या विकासासाठी देणार असे जाहीर केले.
(१,२५,०००,००,००,०००/-₹) अबब! इतके? एका निवडणुकीला? अमिष म्हणून? मागच्या लोकसभेच्या निवडणूकीच्या वेळी ५० हजार कोटी देणार असे बोलले होते मोदीसाहेब. बिहारने सुद्धा त्यांना भरभरून मते दिली. पण मागच्या सव्वा वर्षात ते ५० हजार कोटी दिलेच नाहीत. उलट मागच्याच महिण्यात बिहारमध्ये जाऊन ते जुने पन्नास आणि आणखी ५० हजार कोटी देणार असे बोलले होते. म्हणजे एकून १ लाख कोटी.  आणि आता भाव आणखीन २५ हजार कोटींनी वाढवला. आता झाले सव्वा लाख कोटी. दुब‍ईला जाऊन तिथल्या शेख कडून पैसे आणले की काय मोदींनी? की काळा पैसा आणणार आहेत स्विस बँकेतला?

मला तर असे वाटायला लागले आहे की, महाराष्ट्रात पण पुन्हा निवडणूका घ्याव्यात. आम्ही सर्वच्या सर्व आमदार निवडून द्यायला तयार आहोत. आम्हाला पण सव्वा लाख कोटी द्या.

माझे बिहारच्या लोकांना एक सांगणे आहे, 'बघा बाबांनो! विचार करून मतदान करा. कोण खरा कोण खोटा याचा विचार करा. अपेक्षाभंगाचे दु:ख खुप वाइट असते. हा चुनावी जुमला निघाला तर पोपट होईल तुमचा! सावधान!

ता.क.: जाता जाता आणखी चाळीस हजार कोटी देणार आहेत म्हणे. चक्कर येतेय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा