दिनांक: ९ आॅगस्ट, २०१५
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल एका जुन्या आणि साध्या हाॅटेलमध्ये एकदा जेवायला गेले. जुन्या प्रेमाच्या आठवणी जागवण्यासाठी.
हाॅटेलचा मालक भरपूर खुष झाला. तो दोघांना भेटून गेला आणि दोघांचेही त्याच्या हाॅटेलमध्ये आल्याबद्दल आभार मानले. काही वेळाने एक चिठ्ठी मिशेलकडे वेटरने आणून दिली. मिशेलने चिठ्ठी वाचली आणि गालातल्या गालात हसत बाजूला ठेऊन दिली. ओबामांनी तिला विचारले, "काय आहे चिठ्ठीत?"
तिने सांगितले की, "हाॅटेलच्या मालकाला मला खाजगीत भेटायचे आहे. तो आणि मी एकाच काॅलेजला शिकायला होतो. काहीतरी सांगायचे असेल त्याला."
ओबामा बोलले की, "काही बोलायचे होते तर इथेच बोलायचे होते ना. खाजगीत कशाला?"
तरीही त्यांनी मिशेलला परवानगी दिली.
मिशेल हाॅटेल मालकाला भेटायला गेली आणि दहा मिनिटांनी परत आली तेव्हा ओबामांनी तिला उत्कंठेने विचारले की, "काय झाले. काय बोलला तो." मिशेल गप्प.
"अगं सांग ना." अोबामा.
"जाऊ दे रे त्या आमच्या काॅलेजच्या गोष्टी होत्या." मिशेलने दुर्लक्ष केले.
"सांग. मला ऐकायचे आहे. असे काय होते खाजगी." ओबामा हटून बसले.
'अरे तो सांगत होता की त्याचे माझ्यावर खुप प्रेम होते. पण कधी सांगू शकला नाही."
"ओह! माय गाॅड! मग तू काय बोललीस?" ओबामा.
"मी काय बोलणार ना? चूकचूक, हळहळ करुन परत आले. बिचारा!"
ओबामा तिला खिजवण्यासाठी बोलले. "कसे झाले असते ना तुझे? एका साध्या हाॅटेल मालकाची बायको असती आज."
मिशेल बोलली की, "तो सांगत होता तेव्हा मला तुझी दया येत होती."
"का? का? माझी दया येण्याचे कारण काय?" ओबामांची ऐट.
'अरे मी त्याच्या बरोबर लग्न केले असते तर आज अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असता तो. बिचारा!"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा