दिनांक: भारतीय सौर वैशाख शके १९३७,
१२ मे २०१५
१२ मे २०१५
पणजी : 'मी एखाद्या ठिकाणाहून जात असेन, आणि तेथे पोलिस असतील, तर त्यांनी मला अजिबात सलाम ठोकू नये, असे मी त्यांना निक्षून सांगितले आहे. सलाम संस्कृती पटत नसल्याने पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना सलाम करण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रातून ही संस्कृती दुर करायला हवी.' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
(मटा बातमी-११ मे, २०१५)
(मटा बातमी-११ मे, २०१५)
टिव्हीवर अशोका मालिका पाहताना तो 'चाणक्य' सतत बोलत असतो. 'मुझे इसमे कोई षडयंत्र नजर आ रहा हैं।' त्याला जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पडयंत्रच दिसत असते. 'चाणक्य,' 'चाणक्यनिती,' हे शब्द भाजपच्या संबंधित आणि अधिक जवळचे असल्यामुळे मलाही आपल्या विधानात काहीतरी 'षडयंत्र' दिसत आहे. विचारा कसे ते?
तर त्याचे असे आहे देवेंद्र साहेब! सलाम नाही ठोकायचा तर पोलिसांना नमस्कार तरी करावाच लागेल की नाही. ओळखीच्या आणि मोठ्या माणसांना नमस्कार करणे ही तर आपली भारतीय संस्कृती आहे. मग नमस्कार करून पोलिसांना खाली वाकावे लागेल. कारण तुम्ही गाडीत असणार. तुम्हीच बोलले आहात की 'मी एखाद्या ठिकाणाहून जात असेन, आणि तेथे पोलिस असतील, तर त्यांनी मला अजिबात सलाम ठोकू नये.' याचा अर्थ असा होतो की इतर वेळी तुम्हाला सलाम ठोकला तर चालेल. तुम्ही गाडीत. पोलिस उभा. तुम्हाला नमस्कार करायचा तर त्याला कमरेत वाकून नमस्कार करावा लागेलच. तुम्हाला दिसण्यासाठी. म्हणजे आता सलाम ठोकायचा नाहीतर सरळ सरळ 'मुजराच' करायचा. जाऊ द्या. हलके घ्या. हलके घ्या म्हणजे टेक इट लाईटली. नाहीतर वेगळाच अर्थ घ्यायचे? 'हलके' या शब्दाला मराठीत वेगवेगळ्या अर्थछटा आहेत म्हणून बोललो.
एक विनंती आहे फडणवीस साहेब. सरकार काहीतरी काम करतंय हे दाखवण्यासाठी 'काहीतरीच' बोलत नका जाऊ खोटंनाटं. काय फायदा त्याचा? सहा महिने झाले तुमच्या सरकारला. ना दाभोळकरांचे खुनी सापडले ना पानसरेंचे. गृहखातं तुमच्याकडेच आहेत. त्याकडे लक्ष द्या. काय ह्या फालतू सॅल्यूटबिल्यूट वगैरेच्या भानगडीत पडता? कामं करा कामं! नाहीतर खडसेसाहेब आहेतच टपलेले.
बरं! भेटू या असेच कधीमधी.
आपला आणि पोलिसांचा कैवारी,
-रामदास पवार
अंबरनाथ
आपला आणि पोलिसांचा कैवारी,
-रामदास पवार
अंबरनाथ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा