दिनांक: ८ नोव्हेंबर, २०१४
काय काय जोक करतात हे पेपरवाले!
आजच्या मटाच्या FRONT PAGE-2 ला एक बातमी आहे.
(हाही एक जोकच. एकाच पेपरला दोनदोन मुखपृष्ठ)
"सुरतच्या धावपट्टीवर 'चांदी' आडवी" स्पाइस जेटच्या विमानाला म्हशीची धडक-विमानातील १४६ प्रवासी सुखरूप.
आता तुम्ही सांगा विमान म्हशीला धडक देईल की म्हैस विमानाला?
बातमीत आणखी यापूर्वीची एक घटना सांगितली आहे.
"जुलै २००९ मधे नागपुर विमानतळावरील रनवेवर किंगफिशर एअरलाइंसच्या विमानाला एका 'भटक्या' डुकराने धडक दिली होती.
म्हैस धडक देते. डुक्कर सुद्धा धडक मारतो आणि तोही 'भटका'
(यांचे संपादक घरात डुक्कर पाळतात वाटतं!)
वर प्रवासी सुखरूप पण म्हशीचे आणि डुकराचे काय झाले याचा काहीही उल्लेख नाही.
ह्या मनेका गांधी काय करत आहेत? मुक्या प्राण्यांवर......जाऊ द्या.
काही दिवसांनी अशी बातमी असेल का?
'पुणे-मुंबई रस्त्यावर पादचाऱ्याची डंपरला धडक!' -डंपर आणि डंपरचा चालक दोन्ही सुखरूप!
-रामदास किसकाढू पवार
अंबरनाथ
सुरतच्या धावपट्टीवर 'चांदी' आडवी
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/airport/articleshow/45077076.cms
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा